Rohit Pawar Attacked Rajendra Raut : रोहित पवारांचा आमदार राऊतांवर हल्लाबोल; ‘कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकाल, तर गाठ आमच्याशी हाय’

Barshi Melava : केजीएफ चित्रपटात एक गुंड असतो. त्या गुंडाला वाटतं गावात दुकान माझंच असावं. धंदा माझाच व्हावा. जमीन मीच घ्यावी. वाळू-खडी माझीच असावी. ठेकेदार माझा भाऊच असावा.
Rajendra Raut-Rohit Pawar
Rajendra Raut-Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Barshi, 11 August : गुजरातची गुलामी आणि गुलाबी करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना आगमी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा. अपक्ष जरी कोणी उभा असला आणि त्याने भाजपला पाठिंबा दिला तरी तो भाजपचाच माणूस आहे, एवढं लक्षात ठेवा.

आमदार राजेंद्र राऊत यांना ‘केजीएफ’ चित्रपटातील गुंडाची उपमा देत रोहित पवार यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. या आमदाराला सर्व आपल्यालाच पाहिजे आहे, त्यामुळे येथील लोकप्रतिनिधीचं ऐकून तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकल्या, तर गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही रोहित पवारांनी दिला.

बार्शी येथील शेतकरी मेळाव्यात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आमदार राजेंद्र राऊतांवर (Rajendra Raut) टीका केला. ते म्हणाले, केजीएफ चित्रपटात एक गुंड असतो. त्या गुंडाला वाटतं गावात दुकान माझंच असावं. धंदा माझाच व्हावा. जमीन मीच घ्यावी. वाळू-खडी माझीच असावी. ठेकेदार माझा भाऊच असावा. बार्शीतील काही व्यापाऱ्यांना भेटलो, तर त्यांनी सांगितलं की पहिलं मार्केट येथील लोकनेते उघडतात. मग दुसऱ्यांनी मार्केट उघडायचं.

आगामी विधानसभा निवडणूक ही अशा लोकांना धडा शिकवण्याची संधी आहे. त्या संधीचं तुम्ही सोनं करा. युवकांवर खोट्या केसेस टाकल्या जातात. पण, तुम्ही पोलिसांना घाबरू नका. आगामी दोन महिन्यांत महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांवर येथील लोकप्रतिनिधीचं ऐकून तुम्ही खोट्या केसेस टाकल्या, तर गाठ आमच्याशी आहे, हे लक्षात ठेवावे, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.

Rajendra Raut-Rohit Pawar
Video-Sharad Pawar : मराठा आंदोलकांनी कुर्डूवाडीजवळ अडवली शरद पवारांची गाडी

रोहित पवार म्हणाले, दिल्लीच्या बादशाहला मराठी माणसासमोर झुकवायला भाग पाडणारे नेते म्हणजे शरद पवार आहेत. बार्शी भागात सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, आम्ही अधिवेशनात यावर आवाज उठवत असतो.

सरकारच्या चुकीच्या धोरणमुळे खताच्या किंमती वाढत आहेत. चार वर्षांपूर्वी 4 हजाराच्या आसपास भाव होता आजही तेवढाच आहे. मोदीसाहेब म्हणाले होते शेतकऱ्यांच्या धान्याचा भाव दुप्पट करणार. पण उलट त्यांनी खर्च दुप्पट केला आहे. आजही सोयाबीनचे भाव वाढत नाहीत, हे फडणवीस यांनी लक्षात घालावे

शरद पवार कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांचा फोन पवार गेला की तातडीने ते त्यावेळी निर्णय घ्यायचे. सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांचे 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कांद्याच्या चुकीच्या धोरणमुळे 5 हजार कोटींचे नुकसान झाले आहे.

Rajendra Raut-Rohit Pawar
Akkalkot Assembly Constituency : काँग्रेस उमेदवारीसाठी सिद्धाराम म्हेत्रेंना प्रथमच ‘टशन’; युवा नेत्यासाठी अक्कलकोटमधूनच फिल्डिंग

अजितदादा म्हणाले होते, कांद्याचा निर्णय सरकारने घेतला असं म्हणाले होते. पण कांद्यावरील निर्यातबंदी काय राहिली. अजितदादा तुम्ही भाजपसोबत गेला, तो तुमचा निर्णय चुकला आहे. दादा, तुम्ही कांदा प्रश्नावर सरकारला जाब विचारला पाहिजे होता. सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी काही मतदारसंघात 100 कोटीपर्यंत खर्च केला आहे, अशा शब्दांत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com