Akkalkot Assembly Constituency : काँग्रेस उमेदवारीसाठी सिद्धाराम म्हेत्रेंना प्रथमच ‘टशन’; युवा नेत्यासाठी अक्कलकोटमधूनच फिल्डिंग

Assembly election 2024 : अक्कलकोटमधूनच आतापर्यंत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी सिद्धाराम म्हेत्रे यांचा एकमेव दावा असायचा. मात्र, आता अक्कलकोटमधून काँग्रेसचे युवा नेते, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्यासाठी काँग्रेसमधील काही नेते सरसावले आहेत.
Siddharam Mhetre-Mallikarjun Patil
Siddharam Mhetre-Mallikarjun Patil Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 August : विधानसभा निवडणुकीला आणखी दोन महिन्यांचा कालावधी असला तरी इच्छुकांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच आता जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या उमेदवारीची मागणी काँग्रेसमधील काही नेत्यांनी केली आहे, त्यामुळे अक्कलकोटच्या काँग्रेसच्या उमेदवारीमध्ये ट्विस्ट निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडी (Mahavikad Aghadi) आणि महायुतीकडून (Mahayuti) विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसने इच्छुकांकडून उमेदवारी मागणीचे अर्ज भरून घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून तयारीला वेग दिला आहे, दुसरीकडे शिवसेनेनेही अंतर्गत बैठका घेत व्यूहरचना तयार करण्याला प्राधान्य दिले आहे.

महायुतीमध्येही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जनसन्मान यात्रा काढण्यात येत आहे, तर भाजपकडूनही लवकरच यात्रेची घोषणा होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाकडूनही निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यात येत आहे.

Siddharam Mhetre-Mallikarjun Patil
Video-Naresh Mhaske : ‘विशाल पाटील-विश्वजित कदमांच्या भेटीवेळी ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना बंगल्याबाहेर ताटकळत उभे केले....’

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी विजय मिळविल्यानंतर काँग्रेसमधील विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या आकांक्षांना घुमारे फुटले आहेत, त्यातून एकाच मतदारसंघात अनेकांकडून उमेदवारीसाठी दावे केले जात आहेत.

अक्कलकोट (Akkalkot) मतदारसंघासाठी सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मागील अनेक निवडणुका त्यांनी काँग्रेसकडून लढल्या आहेत. आताही त्यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

आतापर्यंत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी सिद्धाराम म्हेत्रे यांचा एकमेव दावा असायचा. मात्र, आता अक्कलकोटमधून काँग्रेसचे युवा नेते, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्यासाठी काँग्रेसमधील काही नेते सरसावले आहेत.

अक्कलकोट तालुक्यातील काही सरपंच आणि नेत्यांनी शुक्रवारी काँग्रेस भवनात येऊन मल्लिकार्जुन पाटील यांच्या उमेदवाराची मागणी केली आहे, त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातून पक्षश्रेष्ठ कोणाला उमेदवारी देणार, हा प्रश्न आहे.

Siddharam Mhetre-Mallikarjun Patil
Thackeray Vs Shinde : दिल्लीपुढे लोटांगण घालूनच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत; शिवसेनेचा शिंदे गटावर पलटवार

अक्कलकोटच्या उमेदवारीचा विषय सरळ आणि सोपा वाटत असतानाच आता मल्लिकार्जुन पाटील यांच्या उमेदवारीच्या मागणीने मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायचा, असा प्रश्न इतर मतदारसंघाप्रमाणेच काँग्रेस पक्षश्रेष्ठी पुढे निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com