Dhangar Reservation : आरक्षण मिळणार असेल तर...; धनगर आरक्षणाबाबत बोलताना शाहू महाराज स्पष्टच बोलले

UCC News : आपण काही महिन्यांपासून समान नागरी कायदा करण्याबाबत ऐकतो आहे.
Dhangar Reservation
Dhangar Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : 'लोकसभा हे असे स्थान आहे, जिथे सर्वांना आपले विचार व्यक्त करता येतात. काही चर्चा करता येतात. जेणेकरून आपल्या लोकांसाठी आणि देशासाठी योग्य निर्णय घेता येतात. त्याचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे," अशी प्रतिक्रिया कोल्हापूर श्रीमंत शाहू महाराज यांनी माध्यमांशी बोलताना दिली. गणेश चतुर्थीनिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. (If reservation will be available... ; Talking about Dhangar reservation, Shahu Maharaj spoke clearly)

Dhangar Reservation
OBC Kranti News : कुठल्या अटी मान्य करत सोडविले उपोषण? ओबीसी क्रांती मोर्चाला मुख्यमंत्र्यांवर संशय !

या वेळी महिला आरक्षण विधेयकाचे स्वागत करतानाही त्यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली. 1950 पासून घटना अस्तित्वात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून संसद महत्त्वाचे स्थान असल्याचे शाहू महाराज यांनी नमूद केले.

आपण काही महिन्यांपासून समान नागरी कायदा करण्याबाबत ऐकतो आहे. यावरही सविस्तर चर्चा व्हायला हवी. लगेच निर्णय घेतला असे नको. चर्चा घेऊन तो कायदा संमत व्हावा, असे म्हणत शाहू महाराजांनी नमूद केले. तसेच धनगर समाजाच्या आरक्षणावरही त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. 'धनगर समाजाला आरक्षण आह, पण त्यांना ते आरक्षण वेगळ्या कक्षेत हवे आहे. जनतेला योग्य मार्गदर्शन करणे नेत्यांचे कर्तव्य आहे. मिळणार असेल तर त्यांनी स्पष्ट सांगावे; पण नसेल मिळणार तर तेही सांगायला हवे. तसेच हे आरक्षण कशा पद्धतीने ते देणार आहेत ते सर्वांना समजायला हवे. मागण्या काय आहेत आणि कुठे दुरुस्त करणार आहेत, याबाबत सांगणे गरजेचे आहे, असे शाहू महाराज यांनी सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

Dhangar Reservation
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विघ्नहर्त्याचं आगमन; 'दुष्काळाचे सावट दूर कर...' मुख्यमंत्र्यांचं बाप्पाकडे साकडं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com