Vishalgad Fort Encroachment : विशाळगडावरील अतिक्रमणांवर पुन्हा हातोडा? बावनकुळेंच्या फोननंतर जिल्हाधिकारी सक्रीय...

Illegal Constructions on Forts Amol Yedge District Collector News : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करूनच किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण पुन्हा काढण्यात येणार असल्याचे समजते.
Vishalgad Fort Violence In Kolhapur.jpg
Vishalgad Fort Violence In Kolhapur.jpgSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : किल्ले विशाळगडच्या अतिक्रमणावरून जुलै 2024 मध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर पाच महिन्यांनी संचारबंदी हटवण्यात आली. परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा एकदा विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. माजी आमदार नितीन शिंदे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विशाळगड अतिक्रमण मुक्त करावा याबाबतचे निवेदन दिल्यानंतर पुन्हा एकदा अतिक्रमण काढण्याला सुरुवात होणार आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करूनच किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण पुन्हा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली. ता. 13 जुलै 2024 रोजी किल्ले विशाळगडाच्या अतिक्रमणावरून घडलेल्या हिंसाचारानंतर कोल्हापूर जिल्हा पोलिसांकडून या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.

Vishalgad Fort Violence In Kolhapur.jpg
Shivsena Politics : ठाकरेंचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उदय सामंतांचा दुजोरा; म्हणाले, "टप्प्याटप्प्याने..."

या प्रकरणावरून राज्यात बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने याबाबत तात्काळ पावले उचलत किल्ले विशाळगडावरील दीडशे अतिक्रमणांवर हातोडा मारला होता. मात्र काही अतिक्रमण धारकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्या कारवाईला स्थगिती आली होती. तोपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून 90 अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली होती.

हिंसाचार झाल्यानंतर तब्बल पाच ते सहा महिने या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात ही संचारबंदी उठवली होती. त्यामुळे वातावरण काही अंशी पूर्वपदावर येत असताना पुन्हा एकदा अतिक्रमण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Vishalgad Fort Violence In Kolhapur.jpg
Champa Singh Thapa : बाळासाहेबांचा मदतनीस अन् शिंदेंच्या शिवसेनेतील चंपासिंह थापा भाजप मंत्री नाईक यांच्या दरबारात

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर अतिक्रमण काढण्याच्या कामाला पुन्हा एकदा गती येणार आहे. त्याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी किल्ले विशाळगडावर दीडशे अतिक्रमणांपैकी 90 अतिक्रमणे काढली आहेत. उर्वरित सात अतिक्रमणे बाकी आहेत.

काही अतिक्रमणधारक उच्च न्यायालयात गेल्यानंतर पावसाळ्यात होणाऱ्या अतिक्रमण कारवाई स्थगिती आली होती. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच पुरातत्व विभागाने अतिक्रमणावर सुनावणी घेऊन निर्णय द्यायचा आहे. जो निर्णय येईल त्याप्रमाणे कारवाई करण्याला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com