Corruption case Kolhapur : पोलिस अधिकाऱ्याचे हात लाचेने रंगले, एका अधिकाऱ्यांसह तिघेजण लाचलुचपतच्या जाळ्यात.

Police officer caught accepting bribe : पोलिस उपनिरीक्षक आणि एका हेड कॉन्स्टेबल वर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस दलातच लाज घेण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
ACB Trap
ACB TrapSarkarnama
Published on
Updated on

Anti-corruption trap 2024 : पुण्यात जप्त केलेला टेम्पो आणि तक्रारदाराला गुन्ह्यात मदत करतो, असे आश्वासन देऊन 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारा पोलिस अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. गांधीनगर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक आणि एका हेड कॉन्स्टेबल वर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस दलातच लाज घेण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार व त्यांचा मित्र जनावरे वाहतुकीचा व्यवसाय करीत असून तक्रारदार यांच्यासह त्याच्याच साथीदारांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तक्रारदार यांचा गुन्हयात आयशर टैम्पो जप्त आहे.

ACB Trap
Mahayuti News : मुश्रीफ नवव्यांदा, आबिटकर पहिल्यांदा मंत्री; कोल्हापूरकरांकडून स्वागताची जय्यत तयारी

जप्त केलेला टेम्पो सोडवण्यासाठी कोर्टात माहिती सादर करण्यात यावी यासाठी तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक शिरणीरे यांना भेटले होते. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे ३०,००० रूपयांची मागणी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी आपल्याकडे पैशाची मागणी होत असल्याची तक्रार लाच लुचपत विभागाकडे (ACB) दिली होती.

दरम्यान, तक्रारदार यांना फोनवर पोलीस कर्मचारी कांबळे यांची भेट घेण्यास संगितले त्याप्रमाणे तक्रारदार यांनी पोलीस कर्मचारी कांबळे यांची भेट घेतली असता पोलीस कर्मचारी कांबळे यांनी शिरगिरे यांना फोन करून माहिती दिली व तक्रारदारांचा सहकारी यांच्याकडून २० हजार रुपये घेतल्याची माहिती दिली. उर्वरित 15000 रुपयाचे तडजोड करण्याची मागणी केली.

ACB Trap
Santosh Deshmukh: संतोष देशमुखांच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला! प्रतिमेला डाग लागल्यानंतर तरी सरकारला जाग येईल का?

दरम्यान दीपक जाधव यांनी गुन्ह्यात अटकेत असलेला तक्रारदार यांना मदत करण्यासाठी 35000 आणि वाहन सोडवण्यासाठी दहा हजार रुपये अशी मागणी केल्याची माहिती समोर आली. लाचलुचपद विभागाकडे हे लाच घेण्याची माहिती स्पष्ट झाल्यानंतर तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक शंकर जाधव, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगिरे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com