Mahayuti News : मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रीपदं मिळाली आहेत. कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांनी सहाव्यांदा तर राधानगरी विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रकाश अबिटकर यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातून या दोघांना स्थान मिळाले आहे.
हे दोघेही मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी मुंबईत ठाण मांडून होते. त्यानंतर ते नागपूर अधिवेशनाला गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून ते जिल्ह्यात आल्यानंतर स्वागताची तयारी करण्यात येत आहे. कोल्हापुरात येताच या दोघांचे स्वागत कोल्हापूरच्या रांगड्या पद्धतीने होणार आहे.
नागपूर येथे सुरू असलेले हिवाळी अधिवेशन शनिवारी संपल्यानंतर कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर कोल्हापुरात येणार आहेत. महायुतीकडून या दोन मंत्र्यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. ताराराणी चौक ते शाहू समाधी स्थळ या मार्गावर स्वागत मिरवणूक काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसूर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्याबाबतची बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली.
शनिवारी सकाळी दहा वाजता मंत्री मुश्रीफ आणि अबिटकर यांचे ताराराणी चौकात आगमन होणार आहे. महायुतीकडून त्यांचे स्वागत होणार आहे. 500 पेक्षा अधिक दुचाकी वरून त्यांची रॅली निघणार आहे. ताराराणी चौक ते दाभोळकर कॉर्नर, स्टेशन रोड, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक, बिंदू चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत मिरवणूक येणार आहे.
त्यानंतर करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळ येथे अभिवादन केले जाणार आहे. त्यानंतर मुश्रीफ यांचे कागल येथील गैबी चौकात स्वागत होणार आहे. तर गारगोटी येथे आबिटकर कर यांचे स्वागत केले जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.