Karad Airport News: कराडला नाईट लॅंडिंग यशस्वी; सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र होणार

Karad Night Landing: कऱ्हाड येथील विमानतळावर विद्यार्थ्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची कार्यवाही फ्लाईंग क्लबच्यावतीने सुरु करण्यात आली आहे. त्याची माहिती आज श्री. दमानिया यांनी दिली.
Parvez Damaniya, Kunal Desai, Pankaj Patil
Parvez Damaniya, Kunal Desai, Pankaj Patilsarkarnama
Published on
Updated on

-हेमंत पवार

Karad News : कऱ्हाड (जि.सातारा) येथील विमानतळावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने वैमानिकांचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. येथे आज नाईट लॅण्डींग यशस्वी झाले आहे. या विमानतळाची विस्तारवाढ झाल्यानंतर येथे राज्यातील मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येईल, अशी माहिती अँबिशिएन्स एव्हीएशन फ्लाईंग क्लबच्यावतीने संचालक परवेझ दमानिया यांनी दिली.

कऱ्हाड येथील विमानतळावर Karad Airport विद्यार्थ्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची कार्यवाही फ्लाईंग क्लबच्यावतीने Flying Club सुरु करण्यात आली आहे. त्याची माहिती आज श्री. दमानिया यांनी दिली. विमानतळ व्यवस्थापक कृणाल देसाई, प्रशिक्षण केंद्राचे बेस इन्चार्ज पंकज पाटील उपस्थित होते.

श्री. दमानिया म्हणाले, येथील विमानतळ जास्त एअर ट्राफीक नसलेले विमानतळ आहे. त्यामुळे याचा वापर वैमानिक प्रशिक्षण सेंटरसाठी सुरु करता येईल असा मानस होता. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार येथे प्रशिक्षण केंद्र सुरु झाले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीशी तीन वर्षाचा करार केला आहे.

प्रशिक्षणासाठीची पाच विमाने या ठिकाणी आणण्यात आली आहेत. अजुनही मोठ्या क्षमतेची विमाने आणण्यात येतील. यातील दोन विमाने दोन सीटची तर एक विमान चार सीटचे आहे. यासाठी विमानतळावर बाजूला एअरक्राफ्ट हँगर केला असून नाईट लॅण्डींगही करण्यात आले आहे. या विमानतळाची विस्तारवाढ झाल्यानंतर येथे राज्यातील मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येईल.

Parvez Damaniya, Kunal Desai, Pankaj Patil
Satara Maratha Protest : मराठा आंदोलकांवरील खटले विनामोबदला लढणार; सातारा बार असोसिएशनचा निर्णय

स्थानिकांसह देशभरातील सुमारे २५ विद्यार्थ्यांना सध्या येथे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांचा कालावधी दोन वर्षांचा आहे. प्रशिक्षित व्यावसायिक पायलट बनण्यासाठी 200 तासांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना घ्यावे लागणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी विमान कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आता प्रत्यक्षपणे प्रशिक्षणास आजपासून सुरुवात करण्यात आल्यामुळे याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com