Karad Politic's : दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी रातोरात निष्ठा बदलल्या; नेत्यांची धाकधूक वाढली...

Zilla Parishad-Panchayat Samiti Election 2026 : सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीदरम्यान कऱ्हाड उत्तर-दक्षिण भागात नेत्यांच्या समर्थकांचा गटबदल वाढला आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलत असून नेत्यांची चिंता वाढली आहे.
Satara Zilla Parishad
Satara Zilla ParishadSarkarnama
Published on
Updated on

Karad, 03 February : सातारा जिल्हा परिषद, पंचायत समितीची सध्या जोरदार रणधुमाळी सुरु आहे. नेत्यांनीही आपल्याच पक्षाच्या विचाराचे उमेदवार निवडून यावेत, यासाठी फिल्डींग लावली आहे. असे असताना नेत्यांच्या समर्थकांनी आता गटबदलाचा धडाका लावला आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीतच कऱ्हाड उत्तर आणि दक्षिणधील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी गट बदलल्याने नेत्यांचेही टेन्शन वाढले आहे, त्यामुळे तालुक्यातील राजकीय गणिते बिघडू लागली आहेत. ती बिघडलेली गणिते कोणाच्या पथ्यावर पडणार, हे लवकरच समजेल

सातारा (Satara) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रणांगणात कऱ्हाड दक्षिणमध्ये भाजप विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षात अपवाद वगळता दुरंगी, तर कऱ्हाड उत्तरमध्ये भाजप विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अपक्ष अशी तिरंगी थेट लढत होत आहे. जिल्हा परिषदेच्या १२ जागांसाठी ४३ आणि पंचायत समितीच्या २४ जागांसाठी ७३ असे १७१ उमेदवार निवडणुकीतून मतदारांचा कौल आजमावत आहेत.

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) पाल, उंब्रज, मसुर, सैदापुर गटात बहुरंगी, कोपर्डे हवेली, तांबवे, कार्वे, रेठरे बुद्रुक येथे तिरंगी तर येळगाव, काले, विंग आणि वारुंजी गटात दुरंगी लढत होत आहे. सैदापुर, हजारमाची, वडोली भिकेश्वर, कोपर्डे हवेली, तळबीड गणात बहुरंगी, सवादे, कालवडे, रेठरे बुद्रुक, विंग, तांबवे, सुपने, वारुंजी, वाघेरी, मसुर, उंब्रज, चरेगाव, पाल येथे तिरंगी तर कोयना वसाहत, कोळे, गोळेश्वर, कार्वे, शेरे, काले आणि येळगाव येथे दुरंगी लढत होत आहे.

मतदानासाठी अवघे चारच दिवस उरले आहेत, त्यामुळे नेत्यांनीही उमेदवारांना ताकद देऊन विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यात बाजी कोण मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई, पाटण पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर यांची तांबवे जिल्हा परिषद गटात, भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले, राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कऱ्हाड दक्षिणमधील सैदापुर, काले, वारुंजी, रेठरे बुद्रुक, विंग, कार्वे, येळगाव या गटात तर आमदार मनोज घोरपडे, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची पाल, मसुर, कोपर्डे हवेली, उंब्रज या कऱ्हाड उत्तरमधील गटात प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Satara Zilla Parishad
BJP Vs Shivsena : मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर कनिष्ठ मंत्र्याला विचारण्याचा प्रश्नच नाही : रणजितसिंहांनी सामंतांवर डागली तोफ

निवडणुकीच्या धामधुमीत नेत्यांच्या समर्थकांकडून गटबदलाचा धडाका सुरु असल्याचे दिसत आहे. चोरे गावातील पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब साळुंखे-चोरेकर यांच्या कुटुंबातील बाळासाहेब चोरेकर यांनी विधानसभेला भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांना साथ दिली होती. मात्र उमेदवारीतील नाराजीतून त्यांनी भाजपची साथ सोडून माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे समर्थक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार देवराज पाटील यांना यावेळी साथ दिली आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पाली गटात राजकीय खळबळ उडाली आहे.

दरम्यान माजी सहकारमंत्री पाटील यांचे समर्थक आणि सह्याद्री साखर कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील यांनी भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांच्याशी जवळीक साधली आहे. भाजप उमेदवाराच्या थेट प्रचारसभेत ते आमदार घोरपडे यांच्यासमवेत सहभागी होताना दिसत आहेत.

कऱ्हाड उत्तरचे कॉंग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांनी मात्र कॉंग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतले आहे. सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे आमदार घोरपडे यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. मात्र जिल्हा परिषदेला त्यांनी उमेदवारी दिलेल्या कोपर्डे हवेली गटातील उमेदवारांच्या सोबत राहण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेत घेतला आहे.

कऱ्हाड दक्षिणमध्ये उमेदवारीच्या नाराजीतून ॲड. आनंदराव पाटील उर्फ राजाभाऊ उंडाळकर यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला रामराम करुन थेट भाजपचा झेंडा हातात घेतला आहे. त्यांची नाराजी ओळखून भाजपने शेवटच्या क्षणी गळाला लावून येळगाव गटातून त्यांची उमेदवारी पुरस्कृत केली आहे. तसेच येरवळे येथील कॉंग्रेसचे समर्थक विलासराव पाटील येरवळेकर यांनीही भाजपला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.

Satara Zilla Parishad
Ganesh Naik : ‘तुझ्यात हिम्मत असेल तर गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखवं’; साताऱ्यात येऊन नाईकांचे ओपन चॅलेंज

ऐन निवडणुकीच्या धामधुमीतच कऱ्हाड उत्तर आणि दक्षिणधील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी गट बदलल्याने नेत्यांचेही टेन्शन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय गणिते बिघडू लागली आहेत. ती बिघडलेली गणिते कोणाच्या पथ्यावर पडणार, हे लवकरच समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com