Ganesh Naik : ‘तुझ्यात हिम्मत असेल तर गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखवं’; साताऱ्यात येऊन नाईकांचे ओपन चॅलेंज

Satara Zilla Parishad Election 2026 : नवी मुंबई निवडणुकीदरम्यान गणेश नाईक यांनी शंभूराज देसाई यांच्या विधानाला उत्तर देत उघड आव्हान दिले. या वक्तव्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
Ganesh Naik
Ganesh Naik Sarkarnama
Published on
Updated on

Satara, 03 February : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात साताऱ्याचा मालकमंत्री आला होता. ‘आमच्या नेत्याला असं बोललात आणि परवानगी दिली तर मी तुमचा टांगा पलटी करेन’ असं म्हणाला होता. ‘मी तुला परवानगी देतो, तुझ्यात हिम्मत असेल तर गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखवं,’ असे ओपन चॅलेंज वनमंत्री गणेश नाईक यांनी सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दिले.

सातारा जिल्हा परिषद आणि पाटण पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत गणेश नाईक (Ganesh Naik) बोलत होते. ते म्हणाले, ज्यांचे हात साफ असतात, तोच जनता दरबार घेऊ शकतो. ज्याला पाकीट आणि हप्ते मिळतात, तो जनता दरबार घेऊ शकत नाही.

राज्यातील २९ महापालिका निवडणुकीपैकी नवी मुंबईत जिद्दीच्या आणि ताकदीच्या निवडणुका झाल्या. सगळे हरामाचे पैसे नव्या मुंबईच्या जनतेने ठोकरले. पाटणची (Patan) जनताही नवी मुंबईच्या जनतेप्रमाणे स्वाभिमानी असून हरामाच्या पैशाला हात लावणार नाही. तो मालकमंत्री पाच वर्षे दारु खात्याचा मंत्री होता. मी दहा वर्षे होतो. मी सीनियर आहे ना? पण आम्ही कुणाची चपटी बाटलीही घेतली नाही. कुठल्याही हरीच्या लालने सांगावे की, गणेश नाईकांनी तुमचं पाणी तरी मागितलं आहे का? त्याच्याविषयी लोक काय बोलतात, हेही एकदा ऐकून घ्या, असे आवाहन गणेश नाईक यांनी केले.

ते म्हणाले, इथल्या जनतेला मी आवाहन करेन. प्रामुख्याने डी. आर. पाटील, तिकडचे सर्व मतदार बस भरून घेऊन या. सत्यजित पाटणकर यांच्या एकतरी जाहीर सभेला मी येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्यजित पाटणकर हे आमदार होतील, असा मला विश्वास आहे. मला ओळखणारे प्रत्येक गावात आहेत, त्यांनी जनता दरबारात पत्र द्यावे किंवा इथून पत्र पाठविले तरी मी काम करेन. तिथं यायची गरज नाही.

Ganesh Naik
ZP Election : ‘मार्केट कमिटी, नगरपालिका अन्‌ झेडपीची उधारी चुकती करायला स्वतः मुख्यमंत्री बार्शीत येतील’

दादागिरी कोणाची खपवून घ्यायची नाही. ती दादागिरी मोडण्याची ताकद आमच्यात आहे. गुंडा पुंडांचं राजकारण दुसऱ्याला शिकवा. तावरी गावात उमेदवाराला जाऊ दिलं जात नाही. पोलिसांनी उमेदवाराला घेऊन तावरीत जावं. हात लावला तर हा गणेश नाईक बघतो, हे त्या मालकमंत्र्यालच माझं आव्हान आहे, असे चॅलेंजच त्यांनी देसाईंना दिले.

ते म्हणाले, लोकशाहीत प्रेमानं वागावं, मत घ्यावीत आणि मोठं व्हावं पण लोकांची मुस्कटदाबी, गुंडागर्दी करून राजकारण करू नका. हा गणेश नाईक कधी कुणाला घाबरला नाही. आम्ही गुंडागर्दी कधी केली नाही, कुणाला करू देत नाही.

Ganesh Naik
BJP News : 'आवाज कुणाचा' म्हणणाऱ्यांचाच आवाज दबला; संभाजीनगर महापालिकेवर 20 वर्षे एकहाती वर्चस्व गाजवणारी 'शिवसेना' भाजपकडून बेदखल

‘पाटण तालुका गणेश नाईक दत्तक घेतो’

दोन वर्षांपूवी आपल्या माणसाला ब्लेड मारली म्हणे. आता भाजप कार्यकर्त्याला नुसती टाचणी लावून बघा म्हणावं. जयकुमार गोरे हे सोलापूरचे पालकमंत्री आहेत. पण ह्या पाटण तालुक्याला गणेश नाईक यांनी आजपासून दत्तक घेतले. तुम्ही निर्धास्तपणे मतदान करा आणि आपल्या सात लेकांना निवडून द्या. पैशाचं वाटप होत असेल तर तिथंच आडवा. मी जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही बोलतो. आमच्याकडे हरामाचा पैसा नाही, त्यामुळे आम्ही पैसा वाटू शकत नाही. आम्ही प्रेम वाटू, असेही नाईकांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com