Kolhapur Political News : कोल्हापुरात श्रेयवादाची लढाई; आशिष ढवळेंची शारंगधर देशमुखांवर बोचरी टीका, म्हणाले...

Ashish Dhawale Vs Sharangdhar Deshmukh : ...त्या काका-पुतण्याने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी, असंही ढवळेंनी म्हटलं आहे.
Dhavle and Deshmukh
Dhavle and DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर शहरातील खासकरून दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकास कामाच्या श्रेय वादावरून आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू झाला आहे. काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी माजी आमदार अमल महाडिक यांच्यावर आरोप केल्यानंतर त्याला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

ज्यांचे नेतेच दुसऱ्याचे श्रेय लाटतात त्यांनी टीका करणे म्हणजेच चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका भाजपचे माजी नगरसेवक आशिष ढवळे यांनी शारंगधर देशमुख यांच्यावर केली. माजी आमदार अमल महाडिक यांनी पद नसतानाही कोट्यवधींचा निधी मतदारसंघासाठी खेचून आणला याचा पोटशूळ विरोधकांना उठल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात एक कोटी रुपयांच्या जामिनावर सुटलेल्या शारंगधर देशमुख यांनी आपली पातळी ओळखावी, असा इशाराही आशिष ढवळे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhavle and Deshmukh
Kolhapur Politics : राजेश पाटलांनी अजितदादांसमोरच मेहुणे मंडलिकांना काढला चिमटा; ‘तेव्हा खासदार माझ्याविरोधात होते...’

'केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन आणि अमृत योजनेतील विकास कामांची उद्घाटने सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील हे काका-पुतणे करत सुटले आहेत, त्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी.' असे ढवळे यांनी म्हटले आहे. तसेच 'महादेव जानकर हे महायुतीतील नेते आहेत आणि त्यांच्या शिफारसीनुसार मिळालेला हा निधी आहे. उद्घाटने घेऊन या विकासकामांचे श्रेय घेण्याचे काम सतेज पाटलांच्या बगलबच्चांनी करू नये.' असा इशाराही ढवळे यांनी दिला.

याशिवाय 'सतेज पाटील यांच्या मर्जीतील काही ठेकेदारांनी बेकायदेशीरपणे काही विकास कामे केली आहेत आणि नंतर त्याची निविदा प्रक्रिया राबवली आहे हे उघड झाल्यामुळेच देशमुख यांचा तोल ढासळला आहे. लवकरच यावरही कारवाई होईल. सत्य उजेडात येईल.' असेही ढवळे म्हणाले. तसेच, केंद्रात आणि राज्यात सत्ता आमची असताना तुम्ही निधी परदेशातून आणता की काय? असा उपरोधिक सवालही ढवळे यांनी केला.

Dhavle and Deshmukh
Dhangar Reservation : मोदींच्या दौऱ्याआधी धनगर समाजाचा सरकारला 'हा' सूचक इशारा...

'काँग्रेसच्या गलिच्छ राजकारणामुळे देश पिछाडीवर राहिला होता पण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार मुळे देशाची प्रगती जोमाने होत आहे. हे जनतेच्या लक्षात आले आहे त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस कोल्हापुरातून हद्दपार होईल.' असा विश्वासही ढवळे यांनी व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com