ग्रामपंचायत निवडणूक : एकनाथ शिंदे गटाने उघडले खाते; पण भाजपच नंबर वन!

सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणकीत एकाही ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळालेले नाही
Gram Panchayat election
Gram Panchayat electionSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) निवडणुकीत (election) राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्वाधिक नऊ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्या पाठोपाठ स्थानिक आघाड्यांनी सात, शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) प्रत्येकी चार, तर एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटाने एक ग्रामपंचायत जिंकली आहे. काँग्रेस (Congress) पक्षाची कामगिरी मात्र निराशाजनक झाली आहे. त्यांना या निवडणुकीत भोपळाही फोडत आलेला नाही. बार्शीत आमदार राजेंद्र राऊतांनी निर्विवाद वर्चस्व राखले असून करमाळ्यात मात्र बागल गट आणि संजय शिंदे गटात तुल्यबळ लढती झाल्याचे दिसून आले. दक्षिण सोलापूरमध्ये आमदार सुभाष देशमुख गटाला पराभवाचा धक्का बसला आहे. (In Solapur district, BJP is number one in Gram Panchayat elections)

सोलापूर जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतीसाठी गुरुवारी (ता. ४ ऑगस्ट) मतदान झाले. त्याची आज त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी झाली आहे. त्यानुसार भाजपने नऊ, शिवसेनेने चार, राष्ट्रवादीने चार, शिंदे गटाने एक, इतर (स्थानिक आघाड्या) ७ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकही ग्रामपंचायत जिंकता आलेला नाही, त्यामुळे या निवडणुकीत पक्षाचे अस्तित्वच दिसून आले नाही. पहिलीच निवडणूक असूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने मात्र खाते उघडले आहे.

Gram Panchayat election
धनंजय महाडिकांच्या भीमा परिवाराचा सोहाळे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा चौकार

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती आणि त्या जिंकल्याचा नेत्यांना केलेला दावा पुढीलप्रमाणे (तालुकानिहाय) :

करमाळा- वांगी नंबर- १ (संजय शिंदे गट), वांगी नंबर-२ (नारायण पाटील गट), वांगी नंबर-४, भिवरवाडी, वडशिवणे (बागल गट) यांची एकहात्ती सत्ता. आवाटी ग्रामपंचायतीवर (सर्वपक्षीय), सातोली (मोहिते पाटील-नारायण पाटील गट), बिटरगाव- (पाटील व बागल दोन्ही गटाचा दावा), वांगी नंबर- ३ (शिंदे-बागल युती) वांगी नंबर- १ मध्ये आमदार संजय शिंदे गटाचे वर्चस्व असल्याचे दिसत आहे. येथे मोहिते-पाटील व पाटील गटाला धक्का बसला आहे. वडशिवणे ग्रामपंचायतीवर बागल गटाचे वर्चस्व राहिले आहे. येथे जगतापगटविरुद्ध बागल गट यांच्यात लढत झाली. नऊ जागांसाठी येथे निवडणूक लागली होती. यामध्ये बागल गटाला सात तर जगताप गटाला दोन जागा मिळाल्या आहेत. वांगी नंबर ४ व भिवरवाडी ग्रामपंचायतीमध्ये बागल गटाचे वर्चस्व राहिले आहे.

Gram Panchayat election
भाजपच्या सुभाष देशमुखांना झटका : ग्रामपंचायतींमधील सत्ता शिवसेना-काँग्रेसने हिसकावली

माढा : १) म्हैसगाव- राष्ट्रवादी (आमदार बबनराव शिंदे), २) पडसाळी - इतर (राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचे समर्थक असलेल्या दोन गटांत चुरस झाली आहे) बार्शी : १) वांगरवाडी-तावरवाडी- भाजप ( राजेंद्र राऊत गट), २) पानगाव- भाजप (राजेंद्र राऊत गट)

मोहोळ : १) सोहाळे-भाजप (खासदार धनंजय महाडिक गट), पंढरपूर : १) टाकळी (लक्ष्मी)- (एकनाथ शिंदे गट), कोर्टी- इतर. माळशिरस : १) वाघोली-भाजप (मोहिते पाटील). मंगळवेढा- १) संत दामाजी नगर- इतर (सिध्देश्वर अवताडे गट), संत चोखा मेळानगर- इतर ( सिध्देश्वर आवताडे गट), ३) धर्मगाव - इतर, ४) सलगर खुर्द- इतर.

Gram Panchayat election
बार्शीत राजेंद्र राऊतांचीच हवा : दोन्ही ग्रामपंचायतींवर फडकवला विजयाचा झेंडा!

दक्षिण सोलापूर : १) मनगोळी (स्थानिक आघाडी-इतर), २) चिचंपूर ( शिवसेना-ठाकरे). अक्कलकोट : १) वसंतराव नाईकनगर (भाजप), २) मंगरुळ (भाजप), ३) कडबगाव (भाजप, आमदार सचिन कल्याणशेट्टी गट). अक्कलकोट तालुक्यात भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि कॉंग्रेसचे माजी आमदार आणि माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या गटामध्ये या लढती झाल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर दोन्ही गटांकडून सत्तेचे दावे करण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com