Bidri Sugar factory Action : बिद्रीचं नाव अन्‌ विधानसभेचा डाव; राधानगरीत के. पी. पाटलांनी संधी साधली!

K P Patil News : राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत बिद्री कारखान्याच्या डिस्टलरीचा परवाना रद्द केला. त्यांचा रोख आमदार अबिटकर यांच्यावर साधत के. पी. पाटील विधानसभेच्या जोडणीला लागले आहेत.
K. P. Patil-Prakash Abitkar
K. P. Patil-Prakash AbitkarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 01 July : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेऊन बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा हात धरून सत्ता खेचून आणणारे माजी आमदार के. पी. पाटील यांची भूमिकेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर तोफ डागली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत बिद्री कारखान्याच्या (Bidri Sugar factory ) डिस्टलरीचा परवाना रद्द केला. त्यांचा रोख आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर साधत के. पी. पाटील (K. P. Patil) विधानसभेच्या जोडणीला लागले आहेत. कागपत्रांची अपूर्तता, कारवाईची भीती असल्याने माजी आमदार के. पी. पाटील महायुतीत गेल्याची चर्चा रंगली असताना सध्या पाटील यांची भूमिका बिद्रीचं नाव अन विधानसभेचा डाव अशीच चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघातील राजकारण आतापासूनच पेटायला सुरुवात झाली आहे. बिद्री निवडणुकीच्या निमित्ताने गरम झालेलं वातावरण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने थंड होण्याच्या परिस्थितीत असताना निकालानंतर राधानगरी विधानसभा मतदारसंघातून मिळालेल्या मताधिक्याने पुन्हा वनवा पेटला आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार के. पी. पाटील यांची भूमिका संशयास्पद असल्याची शंका महायुतीच्या अनेक नेत्यांच्या मनात आहे. अशातच कारखान्यावरील कारवाई रोखण्यासाठी महायुतीत प्रवेश केलेले माजी आमदार के. पी. पाटील यांच्या बिद्री कारखान्यावर लोकसभेच्या निकालानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत डिस्टलरी परवाना रद्द केला आहे.

याचीच संधी साधत माजी आमदार के. पी. पाटील यांनी विधानसभेचा डाव आखला आहे. त्यांनी थेट आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर निशाणा साधत विधानसभेची तयारी सुरू ठेवली आहे. बिद्रीच्या आडून जनभावनेच्या जोरावर राधानगरीचे मैदान मारण्याचा डाव के. पी. पाटील यांनी सुरू ठेवला आहे.

K. P. Patil-Prakash Abitkar
Ram Satpute : ‘सोलापूर शहर मध्य’ची ऑफर राम सातपुतेंनी नाकारली; माळशिरसमधून विधानसभा लढण्याचे संकेत

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिसताच माजी आमदार के. पी. पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीची वाट धरल्याची चर्चा आहे. त्यातूनच विधानसभेची तयारी सुरू ठेवली असून आमदार आबिटकर यांचा हात या कारवाई मागे असल्याचा बोभाटा राधानगरी विधानसभा मतदारसंघासह भुदरगड आणि करवीर तालुक्यात सुरू आहे.

सभासदांच्या माध्यमातून प्रत्येक तहसील कार्यालयासमोर त्याबाबत निदर्शन करत के. पी यांच्याकडून विधानसभेची तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे. मात्र, आमदार आबिटकर यांच्याकडून या कारवाईमागे आपला कोणताच हात नसल्याचा खुलासा केला असतानाही माजी आमदार के. पी. पाटील यांच्याकडून वातावरणनिर्मिती सुरू आहे.

लोकसभेचा रिपोर्ट वरिष्ठांकडे?

लोकसभेच्या निवडणुकीत राधानगरी मतदारसंघातून महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले. राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे नेते असताना इतक्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळणे शक्य नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला कोणी मदत केली. याचा सविस्तर अहवाल माहितीतील वरिष्ठ नेत्यांकडे सुपूर्द झाला आहे. शिवाय माजी आमदार के. पी. पाटील यांनी महाविकास आघाडीला मदत केल्याचीही चर्चा जोरात सुरू आहे. त्यातूनच ही कारवाई झाल्याची चर्चा राधानगरी विधानसभा मतदारसंघात सुरू आहे.

Edited By : Vijay Dudhale

K. P. Patil-Prakash Abitkar
Vidhan Sabha Monsoon Session Live: पेपरफुटीवरुन विरोधक-सत्ताधारी यांच्यात खडाजंगी; अधिवेशनात कायदा आणणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com