कोरोना सेंटरच्या नावाखाली त्यांनी अफाट माया जमवली : सुजित झावरेंचा नीलेश लंकेंवर आरोप

पारनेर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपचे नेते सुजित झावरे पाटील यांनी पारनेरचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्यावर नाव न घेता टीका केली.
Nilesh Lanke & Sujit Zaware
Nilesh Lanke & Sujit ZawareSarkarnama

Lanke Vs Zaware : कोरोना सेंटरच्या नांवाखाली जनतेकडून मोठ्या प्रणावर पैसा जमा केला. त्या पैशातून राजकारणासाठी तसेच लोकांची मते मिळविण्यासाठी मोहटादेवीचे देवदर्शन घडविले. सुपे एमआयडीसीतून हप्ते गोळा करून तसेच त्या पैशाचा वापर तालुक्यात दहशत निर्माण करण्यासाठी केला जातो. मलाही लोकांना देवदर्शन करून आणावे वाटते मात्र त्यासाठी पैसा कोठून आणावा असे म्हणत मागील अडीच वर्षात फक्त जाहिरात बाजी झाली. एक तरी मोठे काम दाखवा, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपचे नेते सुजित झावरे पाटील यांनी पारनेरचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्यावर नाव न घेता केली.

पारनेरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. झावरे म्हणाले, कोणतेही काम न करता त्यांचे जाहिरात बाजी करून श्रेय घेण्याचे काम सध्या तालुक्यात सुरू आहे. जलजीवन मिशनसाठी आणलेल्या निधीचे श्रेय हे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचेच आहे. मात्र विरोधक जाहिरात बाजी करून आम्हीच हा निधी आणला अशी जाहिरात करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Nilesh Lanke & Sujit Zaware
Supriya Sule : नीलेश लंके लोकसभेसाठी स्टार प्रचारक

ते पुढे म्हणाले की, कोरोना सेंटरच्या नावाखाली अफाट माया जमवली व त्या पैशाचा गैरवापर आता ते करताना दिसत आहेत. देवदर्शन हे फक्त राजकीय हितासाठी व मतांसाठी आहे हे जनतेला समजते. लोकप्रतिनिधी हे लोकांमध्ये मी खूप मोठा निधी आणला असा आभास निर्माण करून जनतेच्या भावनांशी खेळत आहेत. मागील अडीच वर्षांत तालुक्यात एकही मोठे काम झाले नाही. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे विकास कामे आमच्या सरकारच्या माध्यातून होत आहेत. हे जनतेलाही समज आहे त्याचे फुकटचे श्रेय त्यांनी घेऊ नये.

पवार कुटुंबाशी अगदी जवळचे संबंध आहेत असे येथील लोकप्रतिनिधी जनतेला दाखवत आहेत मग त्यांच्या जवळीकतेचा फायदा फक्त गळ्यात हात घालण्यासाठी आहे का? त्यांच्याकडून एखादे मोठे विकास काम तालुक्यासाठी का आणले नाही. ते फक्त पवार कुटुंबाशी माझे जवळचे संबंध आहे, असे तालुक्यात जाहिरात करून दाखवत आहेत. मग सत्तेत असताना तालुक्यात मोठी विकास कामे का आणली नाहीत.

Nilesh Lanke & Sujit Zaware
Nilesh Lanke : धनगर समाजाला नीलेश लंकेंनी दिला शब्द : आरक्षणासाठी विधीमंडळात उठविणार आवाज

पारनेर तालुक्यात जलजीवन मिशन या केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून खासदार डॉ. विखे पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ६० कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. तालुक्याला सुमारे शंभर कोटीपेक्षा अधिक निधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे घर घर जल हर घऱ नल त्यामुळे डॉ. विखे पाटील यांनी निवडणुकीच्या काळात तालुक्यातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी मी कटीबद्द आहे असा शब्द दिला होता तो पाळला आहे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, राहुल शिंदे, जिल्हा सरचिटणीस सुनील थोरात, बापूसाहेब भापकर, अमोल मैड, डॉ. भाऊसाहेब खिलारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com