Kalyanshetti Vs Mhetre : कल्याणशेट्टी-म्हेत्रे वाद वाढला : नव्या कोऱ्या 5 एसटी बस...अवघ्या तासाभरात दोनदा लोकार्पण!

Akkalkot St Bus News : अक्कलकोट आगाराला मिळालेल्या पाच ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बसच्या लोकार्पणावरून आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात श्रेयवाद रंगला आहे.
 Akkalkot ST Bus News
Akkalkot ST Bus NewsSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 July : अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यातील वाद पुन्हा नव्याने पेटला आहे. त्याला आता श्रेयवादाचीही जोड मिळाली आहे. अक्कलकोट आगाराला मिळालेल्या पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बसचे या दोन नेत्यांकडून अवघ्या तासाभरात दोनदा लोकार्पण करण्यात आले आहे, त्यामुळे जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटात सर्वाधिक चुरस अक्कलकोटला पहायला मिळत आहे.

महाराष्ट्र सरकारच्या परिवहन विभागाकडून अक्कलकोट विभागाला पाच नवीन कोऱ्या बस मिळाल्या आहेत. परिवहन मंत्रिपद हे शिवसेनेकडे आहे, त्यामुळे शिवसेनेकडून त्या बसचे श्रेय घेतले जात आहे. अक्कलकोटमध्ये आमदार हे भाजपचे आहेत. त्यातच आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्यातील संघर्ष हा जुनाच आहे.

परिवहन विभागाकडून अक्कलकोट आगाराला मिळालेल्या पाच नव्या राजमाता जिजाऊ एसटी बसचे पहिल्यांदा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. स्वामी समर्थांचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे अक्कलकोटला राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांची सुरक्षित, दर्जेदार आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

कल्याणशेट्टी यांनी पाच बसचे लोकार्पण केल्यानंतर अवघ्या तासभरात विधान परिषदेचे उपसभापती तथा शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या हस्ते पुन्हा लोकार्पण करण्यात आले. या वेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आनंद तानवडे, अमर पाटील उपस्थित होते.

 Akkalkot ST Bus News
Tukaram Mundhe : तुकाराम मुंडेनी भेसळखोरांचे कंबरडे मोडताच गोकुळ अन् वारणाच्या दूध विक्रीवर असाही परिणाम...

नव्या बसचे लोकार्पण हे महायुतीमधील शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना एकत्रित करून करता आला असता. मात्र, अक्कलकोटमधील कल्याणशेट्टी आणि म्हेत्रे यांच्यातील वाद नव्याने पेटल्याचे मानले जात आहे.

 Akkalkot ST Bus News
Solapur ZP : बदली झाली अन्‌ कपाटाची चावीही सोबत नेली; नव्या अधिकाऱ्याला कामच करता येईना!

काही दिवसांपूर्वी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माजी अध्यक्ष (कै.) सातलिंगप्पा म्हेत्रे स्मारकासाठी राखीव असलेल्या जागेवर गणपती मंदिर उभारल्याचे पुढे आले होते. त्यामागे आमदार कल्याणशेट्टी असल्याचा आरोप माजी मंत्री म्हेत्रे यांनी केला होता. त्यावर दोन्ही गटांत धुसफूस सुरू असताना नव्याने श्रेयवाद रंगला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com