Vishal Patil : 'जयंत पाटील उद्या आमचा करेक्ट कार्यक्रम करणार हे माहितीय, तरीही त्यांना पाठिंबा देतोय', विशाल पाटलांनी काय सांगितलं?

Vishal Patil On Gopichand Padalkar In Sangli Marcha : गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सांगलीत आज भव्य मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीने नेतृत्वात काढण्यात आलेल्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चात खासदार ही सहभागी झाले होते.
Gopichand Padalkar And Vishal Patil
Gopichand Padalkar And Vishal Patil sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ सांगलीत मोर्चा काढण्यात आला.

  2. या मोर्चात अपक्ष खासदार आणि काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी सहभाग घेतला.

  3. त्यांनी राजकीय शत्रूत्व असूनही जयंत पाटलांच्या पाठीशी उभं राहण्याचा संदेश दिला.

Sangli News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या विधानानंतर सांगलीसह राज्यभर संतापाची लाट उसळली. सांगलीत तर गेले दोन दिवस आंदोलन केली जात आहेत. अशातच आज (ता.22) पडळकर यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस नेते तथा अपक्ष खसादार विशाल पाटील यांनी हजेरी लावली. त्यांनी त्यांनी पडळकर यांचे नाव न घेत, पाळलेल्या प्राण्यांच्या बद्दल काय बोलायचे असा खोचक टोला लगावला. तसेच जयंत पाटील त्यांच्यात राजकीय शत्रूत्व असल्याचेही मान्य केलं. मात्र जर अशा पद्धतीने कोण टीका करत असेल तर आपण सदैव जयंत पाटलांबरोबर असल्याचेही ते म्हणाले.

पडळकर यांनी, अरे तुझ्या सारखी भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. जयंत पाटील हा बिनडोक माणूस असून तो स्वर्गीय राजारामबापू पाटील यांची औलाद आहेत, असे वाटत नसल्याचे म्हणत खालच्या पातळीवर टीका केली होती. याच टीकेचा खासदार विशाल पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला.

यावेळी विशाल पाटील यांनी, जयंत पाटील आणि आपल्यात राजकीय शत्रूत्व असल्याचे मान्य केले. पण सांगलीसह महाराष्ट्राच्या संस्कृतीला विरोध करणाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेत फटकारले. त्यांनी पडळकरांचे नाव न घेता जोरदार टीका केली. ते म्हणाले, वसंतदादा व राजारामबापू यांचात राजकीय वाद होता, तो वैचारिक वाद होता.

Gopichand Padalkar And Vishal Patil
Vishal Patil : जयंत पाटलांसाठी कट्टर विरोधक विशाल पाटीलही रस्त्यावर : 60 वर्षांचं हाडवैर विसरून मोर्चात चालले

आज आमच्यातही वाद असून तो तिसऱ्या पिढीपर्यंत आला आहे. पण अशा पध्दतीने टीका होत असेल त्यावेळी आम्ही गप्प बसू असे आमच्यावर संस्कार नाहीत. आम्ही एकमेकांवर वाटेल ते बोलू, ते चालतं. मात्र दादा बापू यांनी या जिल्ह्यासाठी काय केले असा प्रश्न कोण करत असेल तर? आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल.

ज्या व्यक्तीने देशाला स्वतंत्र मिळवून दिले, छातीवर गोळ्या झेलल्या, पुरोगामी महाराष्ट्र निर्माण केला, त्यांनी काय केलं असा सवाल आज प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे याच्या मागे दुसरे तिसरे कोण आहे हे पाहावं लागेल. दरम्यान त्यांनी पडळकर यांचे नाव न घेत, पाळलेल्या प्राण्यांच्या बद्दल काय बोलायचे असा खोचक टोला लगावला. कौरव पांडव यांच्यात युद्ध होते, पण चित्रसेनाच्या विरोधात ते एकत्र लढले. आमचंही महाभारता सारखंच आहे. जयंत पाटील आमचा करेक्ट कार्यक्रम करणार हे देखील मला माहीत आहे.

पण अशा वेळी पुरोगामी महाराष्ट्र टिकवण्यासाठी आम्ही एकत्र राहणार आहोत. त्यांच्यावर अशा पद्धतीने खालच्या स्तरावर जावून कोण टीका करणार असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी आम्हीही मैदानात उतरू असाही इशारा विशाल पाटील यांनी यावेळी दिला आहे.

Gopichand Padalkar And Vishal Patil
Vishal Patil : मतचोरीवरून राजकारण तापलं! जयंत पाटील vs गोपीचंद पडळकर युद्धात आता विशाल पाटीलची एन्ट्री

FAQs :

1. सांगलीत मोर्चा का काढण्यात आला?
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ.

2. या मोर्चात कोण सहभागी झाले?
अपक्ष खासदार तथा काँग्रेस नेते विशाल पाटील.

3. विशाल पाटील यांनी काय वक्तव्य केलं?
त्यांनी राजकीय शत्रूत्व मान्य केले, पण टीकेच्या वेळी जयंत पाटलांसोबत असल्याचं सांगितलं.

4. हा मोर्चा कुठे पार पडला?
सांगलीत.

5. या घटनेमुळे काय राजकीय परिणाम झाले?
काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नवी राजकीय चर्चा सुरू झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com