Vishal Patil : मतचोरीवरून राजकारण तापलं! जयंत पाटील vs गोपीचंद पडळकर युद्धात आता विशाल पाटीलची एन्ट्री

Vishal Patil On Vote chori And Gopichand Padalkar : सांगलीतील जत विधानसभा मतदारसंघातील मतचोरीच्या मुद्द्यावरून सध्या जोरदार वाद सुरू आहे. आमदार जंयत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आमने-सामने आले असून आरोप-प्रतिआरोप सुरू आहेत. अशा वादात आता खासदार विशाल पाटील यांनी उडी घेतली आहे.
vishal patil enters in jayant patil vs gopichand padalkar
vishal patil enters in jayant patil vs gopichand padalkarsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांवर मतचोरीचे थेट आरोप केले.

  2. पडळकर यांनी पाटलांना राजीनामा देऊन थेट निवडणुकीत उतरण्याचे आव्हान दिले.

  3. या वादात आता अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी देखील पडळकरांवर हल्लाबोल केला आहे.

Sangli News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण वेळ मतदारसंघासह जिल्ह्यासाठी देणार असल्याचे सांगितले होते. त्या पद्धतीने त्यांनी आपल्या मतदारसंघात हजेरी लावलीच आहे. आता जिल्ह्यातही कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. याच दरम्यान देशासह राज्यात गाजत असलेल्या मतचोराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी थेट भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनाच घेरतं. ज्याला गावात मतदान होत नाही, तो हजारोंच्या मताधिक्याने निवडून येतो. जे अचंबित करणारे आहे. हे फक्त मतचोरीमुळेच झाल्याचे म्हटलं होतं. तर या आरोपाला पडळकर यांनी जशास तसे उत्तर देताना जयंतराव राजीनामा द्या आणि मैदानात उतरा मी तुमच्याविरोधात निवडणूक लढवतो असे आव्हान दिले होते. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. तर पडळकर-पाटील यांच्या युद्ध तापल्याचं चर्चा सुरू झाली होती. या तापलेल्या युद्धात आता अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी उडी घेतली आहे. त्यांनी देखील पडळकर यांच्यावर हल्लाबोल करत जत विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार हरला नाही, तो मतचोरीनं हरवल्याचा आरोप केला आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान व पुरस्कार सोहळ्यात बोलताना जयंत पाटील यांनी, सध्या मत चोरीचा प्रकार ऐकण्यात येत आहे. ज्यात हे सरकारच सामिल असून यांच्याकडे कोणत्या अपेक्षा करणं देखील अवघड आहे. तसेच सभागृहात ‘हिस्ट्रीशीटर’ बसत असल्याचा दावा पडळकर यांचे नाव न घेता केला होता. तर मत चोरीबाबत बोलताना जो राज्यभर लोकप्रिय आहे, तो स्वतःच्या गावात निवडून येत नाही. इकडे ज्याला गावात कोण विचारत नाही, तो मात्र सर्वाधिक मतांनी निवडून येतो, हा प्रकारच नवल असल्याचेही जयंत पाटील म्हणाले होते.

vishal patil enters in jayant patil vs gopichand padalkar
Vishal Patil : ऑफर देवून थकलेल्या भाजपने गेअर बदलला? खासदार विशाल पाटलांचा एक एक बुरूज पाडण्यास सुरूवात

खासदार विशाल पाटील यांनी देखील आमदार जयंत पाटील यांच्या मत चोरीच्या सुरात सुर मिळवत संशय व्यक्त केला. त्यांनी जत विधानसभेला काँग्रेसचा उमेदवार हरला नाही तर मताची चोरी करून हरवला गेला, असा दावा केला. त्यांचा हा दावा गोपीचंद पडळकर यांच्या विजयावर संशय व्यक्त करणारा असल्याचे आता बोलले जात आहे. त्यांनी हा संशय काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केला.

विशाल पाटील यांनी, जत मतदारसंघात विधानसभेल मतचोरीचा प्रकार ठरवून केला गेला. जो पाच पिढ्यापासून जत मतदारसंघातला रहिवाशी आहे, त्याचेच नाव, जात, धर्म बघून मतदारयादीतून उडवण्यात आले. तर जे मतदार मुळ येथील नाहीत अशांची नावे आज मतदारयादीत सापडतं आहेत.

फक्त नावेच सापडत आहेत असे नाही तर ज्या गावची मतदारसंख्याच 500 होती तेथे मतदान 1500 च्या घरात झाली आहे. आपण गाफील राहिलो त्यामुळेच हे झालंय. कुठूनही माणसं आली आणि मतदान करून गेली असाही आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. तसेच सध्या लोकशाहीची मूल्ये धोक्यात आली असून दडपशाही आणि कटकारस्थानाचा खेळ सुरू आहे.

आता खासदार राहुल गांधी यांनी वोटचोरीचा मुद्दा मांडून या सरकारला उघडे केले आहे. जो अधिकारी संविधानाने दिला तोच अधिकार हुकूमशाही सरकारने जनतेपासून हिरावून घेतला आहे. पण आता प्रत्येक कार्यकर्त्याने सजग राहून लोकशाही मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करावे असेही आव्हान विशाल पाटील यांनी केले आहे.

vishal patil enters in jayant patil vs gopichand padalkar
Vishwajeet Kadam Vishal Patil friendship : महायुतीचा चक्रव्यूह अन् 'मविआ'चा रोष; तावून-सुलाखून निघालेले 'विश्वविशाल' मैत्री!

FAQs :

प्रश्न 1: जयंत पाटील यांनी कोणावर आरोप केले?
उत्तर: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर मतचोरीचे आरोप केले.

प्रश्न 2: पडळकरांनी काय उत्तर दिलं?
उत्तर: त्यांनी जयंत पाटलांना राजीनामा देऊन थेट निवडणुकीत उतरण्याचे आव्हान दिलं.

प्रश्न 3: या वादात कोणाची नवीन एन्ट्री झाली?
उत्तर: अपक्ष खासदार विशाल पाटील यांनीही पडळकरांवर हल्लाबोल केला.

प्रश्न 4: जत मतदारसंघाबाबत काय आरोप झाले?
उत्तर: काँग्रेस उमेदवार हरला नाही, तो मतचोरीमुळे हरवला, असा आरोप झाला.

प्रश्न 5: या वादामुळे काय परिणाम दिसून येतो आहे?
उत्तर: महाराष्ट्रातील राजकारणात मतचोरीचा मुद्दा अधिक पेटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com