Sadabhau Khot News : फडणवीसांना दाबण्यासाठी राज्यातील राजकारण्यांची घुसळण : सदाभाऊ खोत

Devendra Fadanvis महाऱाष्ट्राच्या राजकारणाची तुलना करता प्रस्थापिताविरोधात विस्थापितांना घेऊन सरकार बनवायची धमक देवेंद्र फडणवीस यांच्यातच आहे, असेही सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.
Sadabhau Khot, Devendra Fadanvis
Sadabhau Khot, Devendra Fadanvissarkarnama
Published on
Updated on

Sadabhau Khot News : सरकारने इंडियातून बाहेर येऊन भारताकडं बघावे. आव्हान इंडियाचं आहे आणि भारताला जर तुम्हाला बरोबर घ्यायचं असेल, तर भारतातील जनतेकडे लक्ष द्यावे लागेल. तरच इंडियाचा प्रभाव पडू शकेल; अन्यथा इंडिया तुम्हाला जड जाईल, असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला दिला. आत्ताच्या सरकारमध्ये नेमकं कमांड कुणाची आहे, हेच कळायला मार्ग नाही, अशीही टीकाही त्यांनी केली.

माजी मंत्री सदाभाऊ खोत Sadabhau Khot कऱ्हाड (जि. सातारा) दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शेतकऱ्यांचं रक्त जर कोणाच्या काळात सांडलं गेलं असेल, तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात सांडलं गेलं. मुक्या जनावरांना मारावे अशा पद्धतीनं जनतेला मारण्याचं काम या राष्ट्रवादी NCP आणि काँग्रेसच्या Congress सरकारच्या काळात झाले.

राज्यातील सरकारने इंडियातून बाहेर यावं आणि भारताकडं बघावं, आता भारत भारत सगळे करायला लागले आहेत. आव्हान इंडियाचं आहे आणि भारताला जर तुम्हाला बरोबर घ्यायचं असेल तर भारतातील जनतेकडे लक्ष द्यावं लागेल. तरच इंडियाचा प्रभाव होऊ शकेल; अन्यथा इंडिया तुम्हाला जड जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्याच्या राजकारणाची तुलना करता प्रस्थापिताविरोधात विस्थापितांना घेऊन सरकार बनवायची धमक देवेंद्र फडणवीस यांच्यातच आहे. फडणवीसांना दाबण्यासाठी राज्यातील राजकारण्यांची घुसळण सुरू आहे. प्रस्थापित घराण्यांचे वाडे उद्ध्वस्त करण्याचे काम फडणवीसच करू शकतात.

Sadabhau Khot, Devendra Fadanvis
महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांना दाबण्याचा प्रयत्न | Sadabhau Khot News | Devendra Fadnavis |

त्यामुळे त्यांच्याभोवती इतर पक्षांनी पिंगा घालण्यास सुरुवात केली आहे, अशी टिप्पणी करून खोत म्हणाले, आताच्या सरकारमध्ये नेमकी कमांड कुणाची आहे, हेच कळायला मार्ग नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर सरकार पोहाेचवण्याचे काम युतीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शिवसेना वेगळी झाल्याने फडणवीस यांच्यासारखा आश्वासक चेहरा संपुष्टात आला. त्यांच्यासारखा चेहरा आज राज्याला आवश्यक होता. मात्र, तो मिळू शकला नाही. आजचे सरकार जरी आमचे असले तरी ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहाेचण्यासाठी कमी पडले आहे. Maharashtra Political News

Sadabhau Khot, Devendra Fadanvis
Satara Political News : वाघनखांबाबत उदयनराजेंचे महत्त्वपूर्ण विधान; माझा जन्मच झाला नव्हता...

उसाची कांडी होणार सोन्याची....

उसाचे उत्पादन घटणार आहे. उसाचे पूर्ण क्षमतेने गाळप होईल असे वाटत नाही. शेतकऱ्यांनी ऊस घालवण्याची शेतकऱ्यांनी गडबड करू नये. यावर्षी उसाची कांडी ही सोन्याची होणार आहे. त्या कांडीला भंगाराच्या भावात खरेदी करण्याचा डाव हा राज्यातील साखर कारखानदारांनी आखलेला आहे.

Edited By Umesh Bambare

Sadabhau Khot, Devendra Fadanvis
Shivsena Vs BJP : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपचे डावपेच; हजार ‘सुपर वॉरियर्सं'ना बावनकुळे देणार कानमंत्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com