Chandrakant Patil Ink Attack : पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सोलापुरात आलेल्या चंद्रकांतदादांवर शाईफेकीचा प्रयत्न

Solapur Politics : सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच येथे आले होते.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : पिंपरी-चिंचवड शहरात भाजप नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यांपूर्वी घडला होता. पाटील यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून समता सैनिक दल या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून पाटील यांचा निषेध म्हणून हे कृत्य केल्याचा समोर आलंं होते, पण आता परत चंद्रकांत पाटलांना सोलापुरात काळे झेंडे दाखवत शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) हे पहिल्यांदाच येथे आले होते. या वेळी भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांकडून पाटील यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. तसेच पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्नदेखील केला, पण पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळेही अनर्थ टळला. पोलिसांनी भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच सोलापूर शहरात आले आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर ते शासकीय विश्रामगृहात आले. तत्पूर्वी, पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी जमला होता. पुण्यातील शाईफेकीच्या प्रकारानंतर पाटील हे प्रचंड सावध असतात. त्यांच्या आजूबाजूला पोलिसांचाही मोठा गराडा असतो.

नेमकं काय घडलं...?

विश्रामगृहात आल्यावर गाडीतून उतरल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर विश्रामगृहात जात असतानाच बाजूला थांबलेला तरुणाने घोषणाबाजी करत त्यांच्या दिशेने धाव घेतली. हातात काळा झेंडा व शाई घेऊन आलेल्या तरुणाने पोलिसांना काही समजायच्या आत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दिशेने शाईफेक केली, पण काही सेकंदांत सदर पोलिसांनी त्याला पकडून बाजूला नेले आणि वाहनात बसवून ठाण्यात आणले.

या वेळी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, उपायुक्त, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व हवालदार असा तगडा बंदोबस्त त्या ठिकाणी होता.

समता सैनिक दलाच्या मनोज गरबडे या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली होती. गरबडे हा अनेक वर्षांपासून समता सैनिक दलात कार्यरत आहे. तो चिंचवड परिसरात वास्तव्याला होता. तसेच तो अनेक सामाजिक कार्यातदेखील कार्यरत होता. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आता परत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Ink Attack)

(Edited By Deepak Kulkarni)

Chandrakant Patil
Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत शरद पवारांना टाळले; अमित शाह असणार प्रमुख पाहुणे!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com