Satara Political News : शंभूराज देसाई म्हणाले, आमचे आमदार दोषी नाहीत; बाजू मांडण्यास पुरेशी संधी द्यावी...

Shambhuraj Desai शिंदेगट शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईत वेळकाढूपणा होत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीत गडबड करु नये. आमदारांना आपली बाजू मांडण्यास पुरेशी संधी द्यावी. दोषी असले तर कारवाई करावी. पण, आमचे आमदार दोषी नाहीत, त्यामुळे या प्रकरणात वेळकाढूपणा करण्याचा संबंधच नाही, असे स्पष्ट मत सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

शिंदे गट शिवसेनेच्या Shivsena आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईत वेळकाढूपणा होत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली. श्री. देसाई म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्षांच्या समोर सुरु आहे. हा सुद्धा न्यायालयीन प्रक्रियेचाच एक भाग आहे.

आमच्या आमदारांनी म्हणणे मांडलेले आहे. सुनावणीस आमदार प्रत्यक्ष उपस्थित राहत आहेत. आम्ही तीन ते चार लाख लोकांतून निवडून आलेलो आहोत. एका सुनावणीत व तारेखत पुरेसे म्हणणे न ऐकता निर्णय झाला आणि तो आमच्या विरोधात गेला तर आम्हाला आमचे म्हणणे पूर्णपणे व व्यवस्थित मांडायला दिले पाहिजे.

आमदारांनी यापूर्वी लेखी म्हणणे मांडले आहे. आणखी काही न्याय दाखले, निवाडे, जुने संदर्भ द्यायचे आहेत. त्यामुळे या सुनावणीत गडबड करु नये. आम्हाला पुरेशी संधी द्यावी. आम्ही दोषी असलो तर कारवाई करावी. पण आम्ही दोषी नाही हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळेया प्रकरणात वेळकाढूपणा करण्याचा संबंधच नाही.

जरांगे पाटलांचे आभार....

जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास दाखवला असून एकनाथ शिंदेंच मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार असल्याचे कौतूक जरांगे पाटील यांनी केले आहे. यावर शंभूराज देसाई म्हणाले, जरांगे पाटील यांनाही आता खात्री झाली आहे. धाडसाने निर्णय घेणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रुपाने मिळाला आहे. टिकणारे आरक्षण तेच देतील, असा विश्वास त्यांनी काही लाख माणसांच्या समोर व्यक्त केला आहे. त्यामुळे आम्ही जरांगे पाटलांचे आभार मानतो.

Edited By Umesh Bambare

Sarkarnama Podcast : लातूरकरांचा चिमटा, मातब्बराचा पराभव https://www.sarkarnama.in/blog/how-vilasrao-deshmukh-lost-election-in-latur-as91

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com