Ghaywal-Sawant Conection : नीलेश घायवाळला पाठबळ देणारे तानाजी सावंत नाहीत; तर सावंत कुटुंबातील कोण?, चर्चेला उधाण

Rohit Pawar Statement : आमदार रोहित पवार यांनी दावा केला की, पुण्यातील गुंड निलेश घायवाळ अहमदाबाद विमानतळावरून लंडनला पळून गेला असून, त्याला सावंत कुटुंबीय आणि धाराशिव नेत्यांची मदत मिळाली.
Tanaji Sawant-Rohit Pawar
Tanaji Sawant-Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on
  1. आमदार रोहित पवार यांनी दावा केला की पुण्याचा गुंड नीलेश घायवाळ लंडनला अहमदाबाद विमानतळावरून पळून गेला असून, त्याला धाराशिवच्या एका नेत्याने आणि प्रा. राम शिंदे यांनी मदत केली.

  2. पवार यांनी सांगितले की, तानाजी सावंत स्वतः यात नाहीत; पण त्यांच्या परिवारातील काही सदस्य घायवाळला मदत करण्यात सहभागी आहेत.

  3. या आरोपांवर आमदार तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया देत “आम्ही वारकरी आहोत; गुंडांची गरज नाही” असे म्हणत पवारांवर पलटवार केला.

Pune, 09 October : पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवाळ हा लंडनला पळून गेला असेल तर तो अहमदाबाद विमानतळावरून गेला आहे, असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. घायवाळला पळून जाण्यासाठी प्रा. राम शिंदे आणि धाराशिवच्या नेत्याने मदत केली आहे. पण, त्यात माजी मंत्री तानाजी सावंतांचा समावेश नाही. पण त्यांच्या परिवारातील लोक शंभर टक्के सहभागी आहेत, असा आरोपही पवार यांनी केला आहे. त्यामुळे नीलेश घायवाळला सावंत कुटुंबातील कोणी मदत केली, असा सवाल उपस्थित होत आहे.

आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे धाराशिवमधील भूम-परांडा मतदारसंघातून निवडून येतात. नीलेश घायवाळ याला मदत करण्यासाठी धाराशिवचा नेता असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. पण ते तानाजी सावंत नाहीत, तर त्यांच्या कुटुंबातील लोक आहेत, असेही ते म्हणतात. सावंत कुटुंबातील कोण पवनचक्की उभारण्याचा व्यवसाय करतात, याची चर्चा रंगली आहे.

धाराशिवचा नेता म्हणजे तानाजी सावंत. ते स्वतः त्यामध्ये थेटपणे समाविष्ठ नसतील. पण, त्यांच्या परिवारातील काही लोकं नीलेश घायवाळला मदत करण्यात शंभर टक्के गुंतले आहेत. पवनचक्क्यांसाठी ज्या जमिनी घेतल्या जातात. त्यासाठी शेतकऱ्यांना धमक्या दिल्या जातात, त्याच्यामध्ये नीलेश घायवाळ आणि त्याच्या गॅंगचा सहभाग आहे. त्यामध्ये तानाजी सावंत स्वतः नाहीत, पण सावंत परिवारातील काही लोकांचं घायवाळला नक्कीच पाठबळ आहे, असा दावा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे.

आमदार सावंत यांच्या कुटुंबातील कोणत्या सदस्याने घायवाळला मदत केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण खुद्द तानाजी सावंत यांनीही तसे आव्हान आमदार रोहित पवार यांना दिले आहे. आम्हाला गुंडापुंडाची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आमच्या घरातील कोणाचा संबंध घायवाळशी हे रोहित पवारांनी सांगावं : सावंत

रोहित पवार यांनी स्वतः म्हटलं आहे की, यामध्ये तानाजी सावंत यांचा संबंध नाही. पण परिवारातील लोकांचा त्यात सहभाग आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे कोणाचा संबंध आला, काय आला हे सांगावं. आम्ही वारकरी संप्रदायातील माणसं आहोत. आम्हाला गुंड पुंड बाळगायची काही गरज नाही. आम्ही पांडुरंगाच्या बरोबर असतो. राम शिंदेंच्या अगोदर घायवाळ कुटुंब आमदार रोहित पवारांंचेच कार्यकर्ते होते. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच घरावर दगड मारू नये, असा सल्लाही आमदार तानाजी सावंत यांनी रोहित पवारांना दिला.

हे गुंडांचे अन्‌ कॉन्ट्रक्टरचे सरकार

रोहित पवार म्हणाले, गौतमी पाटील गाडीत नसतानाही आपण तिला उचलायची भाषा तुम्ही करता. आता एवढ्या मोठ्या गुंडाला कोणी वरदहस्त दिला. त्याच्यावर अनेक गुन्हे असतानाही त्याला खोटा पासपोर्ट मिळतो. अनेक गुन्हे असताना मोठ्या नेत्याच्या प्रचारामध्ये असतो. त्याच्याच भावाला सहजपणे पिस्तूल परवाना दिला जातो. म्हणजे हे सरकार सर्वसामान्यांचे नसून गुंडांचे आणि कॉन्ट्रक्टरचे सरकार आहे, हे यातून सिद्ध होते.

घायवाळ अधिवेशनात सहजपणे वावर होता

नीलेश घायवळ याला मदत करण्यात हिंगोलीचाही एक नेता आहे. आमदार संतोष बांगर यांचेही नाव नीलेश घायवाळ प्रकरणात चर्चेत आहे. कारण त्यांचे फोटो अधिवेशनाच्या काळात नीलेश घायवाळ याच्यासोबत दिसतात. प्रा. राम शिंदे, संतोष बांगर हे सर्व लोक नीलेश घायवाळ घेऊन अधिवेशनात दिसतात. सामान्य व्यक्तीला त्या ठिकाणी येण्यासाठी परवानगी नाही; पण गुन्हेगारी वृत्तीच्या घायवाळला सहजपणे अधिवेशनात नेले जाते, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

प्रश्न 1 : नीलेश घायवाळ कोण आहे?
पुण्यातील कुख्यात गुंड, ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

प्रश्न 2 : रोहित पवारांनी कोणावर आरोप केले?
प्रा. राम शिंदे आणि धाराशिवच्या नेत्यावर; तसेच सावंत परिवारातील काही लोकांवर अप्रत्यक्ष आरोप केला.

प्रश्न 3 : तानाजी सावंत यांनी काय उत्तर दिले?
आमच्या घरातील कोणाचा घायवाळशी संबंध आहे, ते सांगा; आम्हाला गुंडांची गरज नाही,” असे त्यांनी म्हटले.

प्रश्न 4 : रोहित पवारांनी सरकारवर कोणता आरोप केला?
हे सरकार गुंडांचे आणि कॉन्ट्रक्टरचे असून, गुन्हेगारांना संरक्षण दिले जाते, असा आरोप त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com