Manoj Jarange: आरक्षण हाच माझा उपचार, जरांगेंनी आरोग्य पथकाला परत पाठवलं; मोदींवर बोलणं टाळलं!

Maratha Reservation : मी माझ्या बेमुदत उपोषणावर ठाम आहे."
Manoj Jarange PM Modi Shirdi Visit
Manoj Jarange PM Modi Shirdi VisitSarkarnama
Published on
Updated on

Jalna : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत मंगळवारी संपली. त्यामुळे कालपासून (बुधवार) अंतरवाली सराटी गावात जरांगेंनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने जरांगेंना आरोग्य तपासणीची विनंती केली. मात्र, आरोग्य तपासणीला नकार देत जरांगेंनी पथकाला आल्या हातीच परत पाठवलं.

Manoj Jarange PM Modi Shirdi Visit
PM Modi Shirdi Visit : मोठी बातमी; मराठा, धनगर आरक्षणावर मोदी सूचक वक्तव्य करणार...

"डॉक्टरांचे पथक आले होते. मी त्यांना परत पाठवलं. मराठा आरक्षण हाच माझ्यावर उपचार असल्याचं त्यांना सांगितलं. आरोग्य तपासणीला विरोध दर्शवला. काल छत्रपती संभाजीराजे यांनी शब्द दिला म्हणून मी रात्रीपर्यंत पाणी सेवन केलं. हा त्या मराठ्यांच्या गादीचा सन्मान म्हणून मी निर्णय घेतला होता. मात्र, रात्री बारापासून मी माझ्या बेमुदत उपोषणावर ठाम आहे," असे जरांगे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. याबाबत त्यांनी पत्रकारांनी विचारले असता त्यांनी बोलणं टाळलं. "मोदी आले असतील, त्याचं काय? सध्या आरक्षण हाच माझा उपाय आहे," असे ते म्हणाले.

जरांगेंच्या समर्थनार्थ राज्यभरात विविध गावांमध्येही सर्कलनिहाय साखळी उपोषण सुरू आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आक्रमक वळण लागलंय. बीडच्या मादळमोही गावामध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणादरम्यान तीनआंदोलक मराठा तरुण मोबाईल टॉवरवर चढले आहेत.

गेल्या एक ते दोन तासांपासून आंदोलक हे टॉवरवर चढून बसले आहेत, तर घटनेची माहिती कळताच पोलिस अधिकारी आणि महसूल कर्मचारीदेखील टॉवरखाली आहेत. मात्र, जोपर्यंत सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावत नाहीत, तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा निर्धार आंदोलक मराठा तरुणांनी घेतला आहे.

Manoj Jarange PM Modi Shirdi Visit
Raju Patil : जरांगेंनी वेळ दिला होता, तेव्हा झोपा काढल्या का? राजू पाटलांनी सरकारला विचारला जाब

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com