PM Modi Shirdi Visit : मोठी बातमी; मराठा, धनगर आरक्षणावर मोदी सूचक वक्तव्य करणार...

Modi in Shirdi : मराठा समाजाच्या आरक्षणावर पंतप्रधान काय भाष्य करतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
PM Modi Shirdi Visit
PM Modi Shirdi VisitSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात पेटला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधानांनी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी मराठा समाजाकडून होत आहे.

भूमिका न मांडल्यास सभा समारोपावेळी जाब विचारणार, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते आमदार प्रा. राम शिंदे यांनी मोठी अपडेट दिली आहे.

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल (बुधवार) तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेले होते. राज्याच्या दोन्ही प्रमुखांचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचाच होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी साईंच्या शिर्डी भूमीत मराठा आणि धनगर आरक्षणावर सूचक बोलतील,' अशी माहिती राम शिंदे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

PM Modi Shirdi Visit
Raju Patil : जरांगेंनी वेळ दिला होता, तेव्हा झोपा काढल्या का? राजू पाटलांनी सरकारला विचारला जाब

राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभारले आहे. आरक्षणासाठी 40 दिवसांचा वेळ दिला होता. ती मुदत संपल्यानंतर आता पुन्हा जरांगे पाटील आंदोलनाला बसले आहेत. यांनतर मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठ समाज राज्यात आक्रमक झाला आहे.

प्रस्थापित मराठा आमदारांविरोधात मराठा समाजाने गावबंदी केली आहे. काही ठिकाणी मराठा नेत्यांना रोषाला सामोरे जावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणावर पंतप्रधान काय भाष्य करतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

राम शिंदे म्हणाले, "मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटलेला आहे. तो दिवसेंदिवस संवेदनशील होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेले होते.

या दोन्ही राज्य प्रमुखांची पक्षश्रेष्ठींशी मराठा आरक्षणासंदर्भावर नक्की चर्चा केली असणार आहे. त्यामुळे साईंच्या पावन भूमीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणावर सूचक वक्तव्य करतील". राज्यातील आरक्षणाचा प्रश्न महायुतीचे सरकारच मार्गी लावेल, असेही राम शिंदे म्हणाले.

धनगर समाजालादेखील आरक्षण मिळणार

धनगर समाजाच्या आंदोलनाविषयी सह्याद्रीवर दोन तास बैठक झाली आहे. यावर सर्व बाजूंनी चर्चा झाली आहे. धनगर समाजाच्या नेत्यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहे. त्यावर ठोस पाऊल उचलण्याची ग्वाही महायुती सरकारने दिली आहे.

दसरा मेळाव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आरक्षणासंदर्भातील प्रश्नांवर समन्वयकाची भूमिका बजावत आहेत. महायुती सरकारच्या काळातच मराठा, धनगर आरक्षण मिळेल, असे राम शिंदे यांनी सांगितले.

PM Modi Shirdi Visit
PM Modi in Shirdi : विखेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक; मोदींच्या दौऱ्यासाठी आलेल्या बस गाड्या पाठवल्या परत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com