NCP Vs Mahayuti: जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचं कटकारस्थान सांगितले, उरण ईश्वरपूरमध्ये बदनाम करण्याचा डाव

Sangli Politics: सांगली जिल्ह्यातील उरण ईश्वरपूर नगरपालिका निवडणूक वेगळ्या वळणावर पोहचले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा रंग तापत असताना महायुती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांची ईषा शिगेला पोहोचली आहे.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News: सांगली जिल्ह्यातील उरण ईश्वरपूर नगरपालिका निवडणूक वेगळ्या वळणावर पोहचले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा रंग तापत असताना महायुती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांची ईषा शिगेला पोहोचली आहे. अशातच आज उरण ईश्वरपूर नगरपालिकांमध्ये महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगला. महायुतीच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर आता आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या कार्यकर्त्यांनी देखील त्याच पद्धतीने प्रतिउत्तर दिला आहे.

अल्पसंख्यांक समाज व मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा विरोधकांचा हा खोटा व घाणेरडा प्रकार आहे. माझ्या प्रभागात विरोधी उमेदवारास प्रचार करण्यास कोणीही रोखलेले नाही. ते माझ्या विरोधी आक्षेपार्ह पत्रक वाटत होते,ते वाटू नका असे कार्यकर्त्यांनी त्यांना समजून सांगितले. मात्र, त्यांनी त्याचा कांगावा केला आहे.

ही घटना घडली, त्यावेळी मी पक्ष कार्यालयात होतो. मी माझ्या घराजवळ पोचेपर्यंत विरोधी नेते,पोलीस अधिकारी तिथे पाच मिनिटात कसे पोचले?विरोधकांना उरूण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने त्यांनी मी,माझा पक्ष व नेत्यास बदनाम करण्यासाठी हा पूर्वनियोजित डाव खेळत असल्याचा आरोप माजी नगरसेवक खंडेराव जाधव यांनी केला.

मात्र, या शहरातील जनता अशा प्रकारने विचलित न होता आ.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे व सर्व उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून देणार आहे,असा विश्वास माजी नगरसेवक खंडेराव जाधव यांनी व्यक्त केला.

Jayant Patil
Anagar Election: राज्यात गाजलेल्या अनगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट; राजन पाटलांना दिलासा, थिटेंना धक्का

खंडेराव जाधव पुढे म्हणाले,माझ्यावर पूर्वी खोट्या दोन तक्रारी झाली होत्या. त्यात न्यायालयाने निर्दोष केले आहे. तरीही विरोधकांनी त्याचा वापर करून माझी बदनामी केली. आम्ही तशी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

माझा विरोधी उमेदवार व विरोधकांनी ठरवून हा बनाव केला आहे. विरोधी उमेदवारास कोणीही दमदाटी केलेली नाही,धमकी दिलेली नाही. त्याने कांगावा करून विरोधी नेत्यांना फोन असल्याचा आरोप खंडेराव जाधव यांनी केला.

आनंदराव पवार,चिमण डांगे, केदार पाटील व 25-30 कार्यकर्ते, तसेच पोलीस अधिकारी तेथे आले. यावेळी माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी करण्यात आली,माझ्या एका मागासवर्गीय कार्यकर्त्यास जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली आहे. आम्ही तीही तक्रार देणार आहोत. विरोधी उमेदवाराचे रडा-रडीचे नाटक आणि उपोषण हा सहानुभूती मिळविण्याचा खोटा प्रकार आहे. त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांनी आपण काय करतो? याचे आत्मचिंतन करावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com