Islampur Politics: उरण -ईश्वरपूर आणि सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला पराभूत करून माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी आपला करिष्मा दाखवून दिला. पराभवाची सल मनात राहिलेल्या भाजपने आता शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमदार जयंत पाटील यांचा गेम करण्याची रणनीती आखली आहे. पहिला निशाणा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक तर दुसरा निशाणा उरण-ईश्वरपुरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यावर लावला होता. तर दुसरा निशाण्यात नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे पद अपात्र करण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या बंधूंचे पद ही अपात्र करण्यात आले. शिवसेनेचे जयकर जाधव यांनी याबाबत तक्रार अर्ज दिले असली तरी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने आपला सूड उगवल्याचे बोलले जाते.
अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि बंधू सुनील मलगुंडे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडे तक्रार केल्यानंतर झालेल्या सुनावणीत नगराध्यक्ष मलगुंडे आणि नगरसेवक सुनील मलगुंडे हे अपात्र ठरले. या निर्णयाच्या विरोधात माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली. नगराध्यक्ष अपात्र प्रकरणात भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन जयंत पाटील यांच्या समर्थकांना टिपण्याचा डाव आखल्याचे बोलले जात आहे.
ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत जयंत पाटील यांच्या गटाचा दणदणीत विजय झाला. यामध्ये आनंदराव मलगुंडे आणि महायुतीचे विश्वनाथ डांगे यांच्यातील लढत चर्चेची ठरली. भाजपला अर्थात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मोठा दणका बसला. हाच पराभव भाजपच्या मनात आणखीन सल करून राहिला. जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांचे कट्टर समर्थक वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष जयकर जाधव यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यारूपाने जयंत पाटील यांना टिपण्याचा डाव आखला आहे.
एकीकडे नगराध्यक्ष अपात्रतेचा धक्का जयंत पाटील यांना बसला आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून एनडीएला पाठिंबा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची घेतलेली भेट यामुळेच भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सध्या ईश्वरपूरच्या राजकारणात सुरू आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन जयंतरावांचे कट्टर समर्थक असलेल्या आणखी पाच नगरसेवकांवर अपात्रतेचे बडगा उगरण्याची भीती दाखवली आहे. यावरूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि महायुतीमध्ये अपात्रतेवरून चांगलेच राजकारण पेटणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.