जयंत पाटील आले आणि सुजय विखेंचे टेन्शन वाढवून गेले

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी दोन दिवस अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यात आले आहेत.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात विधान परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था आदींच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी दोन दिवस अहमदनगर जिल्ह्यात आले आहेत. या यात्रे निमित्त जयंत पाटील यांनी आज अहमदनगर शहर, पारनेर व श्रीगोंदे येथे पक्ष बांधणी कामाचा आढावा बैठका घेतल्या.

अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली. या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना जयंत पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आपण 54 नाही तर 90-100 जागा जिंकू शकतो, मात्र यासाठी आपल्याला संघटना बांधणीवर भर द्यावा लागेल. आपण सत्तेत आहे म्हणून पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राष्ट्रवादीच्या 16 ही सेलने पूर्ण क्षमतेने काम करणे आवश्यक आहे. जनसामान्यांत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे त्या सोडविणे याला प्राधान्या द्या, अशा सूचनाही जयंत पाटील यांनी दिल्या.

Jayant Patil
महापालिका प्रभाग रचना : जयंत पाटील यांनी काँग्रेसला पाडले तोंडावर

पाटील पुढे म्हणाले, अहमदनगर जिल्हा हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने नेहमीच शरद पवार यांना साथ दिली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील 12 पैकी 6 जागा राष्ट्रवादीने पटकावल्या. मात्र आपल्याला ही संख्या द्विगुणीत करायची आहे.

Jayant Patil
कोविड सेंटरवर फोटो काढणे एवढाच काहींचा उद्योग - खासदार डॉ. सुजय विखे पाटील

मागील लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपयश आले, मात्र आगामी निवडणुकीत आपला व आपल्या उमेदवाराचा जनसंपर्क वाढवा. याच जनसंपर्काचा उपयोग करून जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद आपल्याला वाढवायची आहे. पुढील वेळी लोकसभेतही पक्षाला उत्तम यश मिळावे यादृष्टीने काम करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाला राष्ट्रवादीने लक्ष केले असल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे टेन्शन वाढले आहे.

या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार संग्राम जगताप, आमदार अरूण जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, नरेंद्र घुले, अविनाश घुले, संपत बारस्कर आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com