मोदी साहेबांच्या कृपेने पेट्रोल लवकरच 150 रुपये प्रतिलिटर होईल : जयंत पाटलांचा टोमणा

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.
Jayant Patil, Narendra Modi
Jayant Patil, Narendra Modisarkarnama

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) साहेबांच्या कृपेमुळे पेट्रोल (Patrol) 118 रुपयाने झाले आहे. पुढच्या वेळी 125 त्यानंतर 150 सुद्धा होईल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केंद्र सरकारला लगावला. महागाईची झळ सर्व सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. याचा विचार गांभीर्याने केला पाहिजे. केंद्र सरकारने (Central Government) यावर योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

Jayant Patil, Narendra Modi
कात्रज डेअरी : केशरताई पवार ठरल्या पहिल्या महिला अध्यक्षा; राहुल दिवेकर उपाध्यक्ष

जयंत पाटील आज (ता. ४) सांगलीमध्ये आर. आर. पाटील सुंदर गांव पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मतदाराच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ट लागेल असे वक्तव्य केले होते. यावर पाटील म्हणाले, क्रिकेटमध्ये वाडेकर इंग्लंडला जाऊन आले. त्यावेळी भारताचा दारुण पराभव झाला. त्यावेळी त्यांनी सांगितले आम्हाला 11 खेळाडूंच्या नाहीतर 13 खेळाडूंच्या विरोधात खेळायाला लागले. कारण दोन पंच देखील आमच्या विरोधात होते, असे वाडेकर म्हणाले होते. त्याच पद्धतीने इडी (ED) आणि सीबीआय (CBI) आमच्या विरोधात आहेत. त्यामुळे तसाच प्रकार देशात चालू आहे, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

शेजारच्या देशात महागाईची जी परिस्थिती झाली आहे. त्याठिकाणी नियोजनबद्ध असे काही नाही. मात्र, मनमोहन सिंग यांनी 1991 पासून आर्थिक व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे कोणताही परिणाम भारताला सोसावा लागला नाही. आज तीच व्यवस्था चालू असेल तर भारताला ही त्याची झळ बसणार नाही, अशी खात्री आहे, असेही पाटील म्हणाले.

Jayant Patil, Narendra Modi
चंचल स्वभावाचे राज ठाकरे ऋतूप्रमाणे बदलणारे ; गुलाबराव पाटलांचा टोला

सांगली जिल्ह्यात मॉडेल स्कूल योजना राबविण्यात आली आहे. यामध्ये साडे तीनशे शाळा मॉडेल साठी घेतलेल्या आहेत. उर्वरित भविष्य काळात घेण्यात येईल. अतिशय उत्तम दर्जाचे शिक्षण आणि मॉडेल स्कूल जिल्हा परिषदेचे असावे ही संकल्पना आहे. नवा उपक्रम हाती घेतला आहे. स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम झाली की त्याचा आदर्श महाराष्ट्रातील अनेक जिल्हे घेतील, असेही पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com