Jayant Patil & Sharad Pawar : जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार? शरद पवारांच्या समोरच मोठं विधान

NCP Sharadchandra Pawar : आतापर्यंत अनेकांनी माझे दिवस मोजले आहेत. आता फक्त चार महिने काही बोलू नका. माझ्यावर टीका करायची असेल तर थेट पवार साहेबांकडे जाऊन तक्रार करा. मात्र ट्विटरचा वापर करू नका.
Sharad Pawar, Jayant Patil
Sharad Pawar, Jayant PatilSarkaranama

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला धूळ चारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडणार असल्याचे विधान केले. अनेकांनी माझे दिवस मोजले, मात्र तुम्ही चार महिने कळ काढा, असे म्हणत पाटलांनी नोव्हेंबरमध्ये पद सोडणार असल्याचे सांगितले. यामुळे शरद पवार गटासह राजकीय वर्तुळात त्यांच्या जागी कोण येणार, याचीच चर्चा सुरू झाली आहे.

जयंत पाटील Jayant Patil म्हणाले, आतापर्यंत अनेकांनी माझे दिवस मोजले आहेत. आता फक्त चार महिने काही बोलू नका. माझ्यावर टीका करायची असेल तर थेट पवार साहेबांकडे जाऊन तक्रार करा. ते माझ्या दोन कानाखाली मारतील किंवा काही करतील. मात्र ट्विटरचा वापर करू नका. पक्ष हा राज्यातील लोकांचा आहे. कुणा एकाचा आहे. नोव्हेंबरनंतर मीच नमस्कार करेन, असे म्हणत पाटलांनी विधानसभा निवडणुकीनंतर पद सोडण्याचे संकेत दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 8 खासदार निवडून आणले आहे. विधानसभेतही मोठे यश मिळणार आहे. पण मी 400 पार म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींसारखी चूक करणार नाही. प्रत्येक सीट निवडून आणायची माझी जबाबदारी आहे. त्यासाठी शांतपणे काम करावे लागते. आता माझ्याबाबत कुणाची तक्रार असेल तर थेट पवारांकडे करा. त्याबाबत जाहीर बोलू नका. त्यामुळे राज्यातील कार्यकर्त्यांसह लोक प्रभावीत होतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आताची लोकसभा निवडणूक अवघड होती. सध्याचे राज्यातील महायुती सरकारला लोक कंटाळले आहेत. हे सरकार नको म्हणणारे 60 ते 65 टक्के लोक आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक सोपी आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.

Sharad Pawar, Jayant Patil
Jayant Patil : 'रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है...'; जयंत पाटलांचा महायुतीला टोला

दरम्यान, गेल्या वर्षी वर्धापन दिनी तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे दिवस सांगून पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ते शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झाले. या प्रसंगाचा संदर्भ देत जयंत पाटलांनी नाव न घेता अजितदादांना टोलाही लगावला आहे.

Sharad Pawar, Jayant Patil
Nilesh Lanke : खासदार लंकेंना राजभवनात सोडतील का? शशिकांत शिंदे म्हणाले, "पंतप्रधान मोदी देखील..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com