Jayant Patil : 'रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है...'; जयंत पाटलांचा महायुतीला टोला

NCP Sharadchandra Pawar Anniversary Day : लोकसभा निवडणुकीत महायुतीने मोठ्या घोषणा केल्या होत्या. विरोधक संपलेच असे वातावरण करण्यात आले. निकालात मात्र ज्येष्ठ नेते शरद पवारांची कमाल दिसून आली.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : लोकसभा निवडणुकीत महायुतीने मोठ्या घोषणा केल्या होत्या. विरोधक संपलेच असे वातावरण करण्यात आले. निकालात मात्र ज्येष्ठ नेते शरद पवारांची कमाल दिसून आली. महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या.

लोक सोडून गेले म्हणून काय झाले आमच्याकडे हेडमास्तर असे म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीतील नेत्यांना 'रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शरद पवार', म्हणत टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमोहोत्सवानिमित्त नगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात जयंत पाटील Jayant Patil बोलत होते. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत पवारांना बारामतीतच अडकवून ठेवण्याची इच्छा दिल्लीश्वारांची होती.

त्यांनी सुप्रिया सुळेंचा पराजय करण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. मात्र निवडणुकीत राज्यात फिरणार नाहीत, ते पवार कसले. संपूर्ण निवडणुकीत राज्यात शरद पवारांची लाट दिसून आली. त्यातूनच 10 पैकी 8 जागा निवडून आल्या आहेत, असा दावा पाटालांनी केला.

आता अनेकजण पक्ष सोडून गेले. कुणी गेले तरे फरक पडणार नाही, कारण शरद पवार नावाचे विद्यापीठच आपल्याकडे आहे. त्यांनी अशा अनेक प्रसंगांना ते सामोरे गेले आहे. माझ्या शाळेचा हेडमास्तर खमक्या आहे. आता नव्या पिढीला उभे करण्याचे काम पवार करतील.

त्यांनी 1999 मध्ये अर्थमंत्री केले. आर. आर. पाटील, अनिल देशमुख यांच्यासारख्या अनेकांना संधी दिली. आजही त्याच मूडमध्ये पवार साहेब आहेत, असे म्हणत आगामी विधानसभेत अनेक नवीन चेहरे असतील, असेच पाटलांनी सूचवले.

Jayant Patil
Murlidhar Mohol Portfolio : मुरलीअण्णांचे विमान उडाले! मोहोळांकडे सहकार आणि नागरी उड्डाण खाते

आताची लोकसभा अवघड होती, मात्र विधानसभा सोपी आहे. राज्यात महायुती सरकार गेले पाहिजे असे मानणारी 60 ते 65 टक्के लोक असल्याचा दावा करून विधानसभा जिंकण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला. त्यांनी चाल करून आलेल्या पेशावा रघुनाथरावांना खलिता पाठवून इशारा देत लढाईचे आव्हानच दिले होते. माघार घेतली नाही. त्यामुळे या स्वाभिमानी मातीस वंदन करण्यासाठी आलो असल्याचेही पाटलांनी सांगितले.

Jayant Patil
Dhananjay Munde : 'अजितदादांच्या पायाची शपथ घेवून सांगतो...' ; धनंजय मुंडेंनी तटकरेंना दिला शब्द!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com