Jayant Patil : थोरल्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जयंतरावांनी व्यक्त केली 'ही' अपेक्षा!

Pratik Patil Birthday : आपल्या परिसरातील ज्येष्ठांचा प्रेमळ नातू म्हणून तू सहज वावरतोस. तुझ्यात रुजलेले हे विविध गुण पाहिले की समाधान वाटते. तुझ्या हातून सदैव सत्कार्य घडो ह्याच सदिच्छा!
Jayant Patil-Pratik Patil
Jayant Patil-Pratik Patil Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 19 July : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील हे राजकारणातील अत्यंत दिलखुलास व्यक्तीमत्व ओळखले जाते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पालक नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे पक्षातील अनेक नेत्यांशी ते त्याच भूमिकेतून वागत आले आहेत. आज त्यांचे थोरले चिरंजीव प्रतीक पाटील यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त जयंतरावांनी आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘(स्व.) राजारामबापूंचा वारसा पुढे नेत असल्याचे पाहून आनंद वाटतो’, हे सांगताना काही अपेक्षाही बोलून दाखवल्या आहेत.

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी थोरले चिरंजीव प्रतीक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे, प्रतिक, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! माझा मुलगा म्हणून जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो, तेव्हा प्रचंड अभिमान वाटतो. स्व. राजारामबापू पाटील यांच्याकडून समाजसेवेचा आलेला वारसा तू अतिशय आत्मियतेने पुढे घेऊन जात आहे.

शेतकरी हितासाठी एक पाऊल पुढे जात तू पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान अवगत करून देत उत्पन्न वाढीचा मार्ग तू त्यांना दाखवला आहे. लोकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठीची तुझी धडपड पाहून खरंच आनंद होतो. आरोग्य शिबिरांचा विक्रम तू कारावास, अशी अपेक्षा करतो. तरुणांमध्ये उद्यमशिलता जागृत व्हावी, यासाठी आयबीएफच्या (इस्लामपूर बिझनेस फोरम) माध्यमातून सुरू असलेले तुझे कार्य युवकांना स्वयंपूर्णतेकडे नेणारे आहे.

आपल्या परिसरातील ज्येष्ठांचा प्रेमळ नातू म्हणून तू सहज वावरतोस. तुझ्यात रुजलेले हे विविध गुण पाहिले की समाधान वाटते. तुझ्या हातून सदैव सत्कार्य घडो ह्याच सदिच्छा!, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी आपल्या मुलाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Jayant Patil-Pratik Patil
NCP News : एका आठवड्यात राजीनामा द्या; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यासह दोन आमदारांना आदेश

प्रतीक पाटील हे माजी मंत्री जयंत पाटील आणि शैलजा पाटील यांचे थोरले चिरंजीव आहेत. प्रतीक हे उच्चशिक्षित असून सध्या ते राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. जयंत पाटील यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघाची संपूर्ण धुरा सध्या प्रतीक पाटील सांभाळत आहेत. निवडणुकीच्या रणनीतीपासून सर्वच पातळीवर प्रतीक पाटील सध्या जयंत पाटील यांचे राजकारण पाहत आहेत. इस्लामपूर मतदारसंघात त्यांचा कायम संपर्क असतो.

जयंत पाटील यांना भेटायला आल्यानंतर ते नसतील तर प्रतीक पाटील येणाऱ्या सर्वांचे आपुलकीने आदरातिथ्य करत असतात. लोकांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सध्या त्यांच्यावरच आहे. इस्लामपूर बिझनेस फोरमच्या माध्यमातून नवे उद्योजक घडविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. या शिवाय क्रीडा क्षेत्रातही सक्रीय आहेत. व्हॉलिबॉल संघटनेवर त्यांनी काम केले आहे. म्हणजेच शेतीपासून खेळापर्यंत सर्वच क्षेत्रात प्रतीक पाटील यांचा वावर आहे.

Jayant Patil-Pratik Patil
NCP Politics : काका-पुतण्यांना एकत्र येण्यापूर्वी 'भाजपला' विचारात घ्यावं लागेल : राष्ट्रवादी विलीनीकरणावर तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं!

लोकसभेसाठी झाली होती चाचपणी

लोकसभेच्या इचलकरंजी मतदारसंघातून प्रतीक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी चाचपणी करण्यात आली होती. त्यातील काही विधानसभा मतदारसंघात प्रतीक पाटील यांच्याबाबत अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांचा लोकसंपर्क मोठा असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com