

Solapur Political News : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. उमेदवार चाचपणीसाठी सुरूवातही झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते उत्तम जानकर यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले आहे.
त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक विधान केले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सोमवारी माळशिरसमध्ये होती. त्यावेळी जयंत पाटील Jayant Patil म्हणाले, महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटपाबाबत चर्चा झालेली नाही. त्यामुळे येथून आत्ताच उमेदवार घोषित करणे उचित ठरणार नाही. पण उत्तम जानकरांनी आता महाराष्ट्रभर फिरले पाहिजे. आमच्याकडे आता चांगले वक्ते, नेते राहिले नाहीत. ते निघून गेले आहेत.
पक्षात फूट पडल्यानंतर आम्ही नवीन नेतृत्व, नेते तयार करण्यावर भर देत आहोत. त्यामुळे जानकर Uttam Jankar यांनी सातारा, सोलापूर, सांगलीसह राज्यभर फिरावे. तुम्ही येथून 400 टक्के निवडून याल, यात काही वाद नाही. पण तुम्ही फिरले पाहिजे, असे म्हणत पाटील यांनी माळशिरसमधून जानकरांची उमेदवारी फिक्स असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले.
जयंत पाटील यांच्या विधानावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही पाठिंबा दिला. ते म्हणाले, माळशिसरबाबत कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. बाळदादांनी यापूर्वी सांगितले म्हणजे ती काळ्या दगडावरची पांढरी रेघ. त्यामुळे जानकरांनी, जयंत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यभर फिरावे. येथील चिंता करू नये. तसेच सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा मागून घ्या. त्या सर्व निवडून आणू, असा शब्दही मोहिते पाटील यांनी पाटील यांना दिला.
ऐन लोकसभा निवडणुकीत उत्तम जानकरांनी भाजपमध्ये बंडखोरी केली. त्यांनी भाजपमधून शरद पवार गटात आलेल्या मोहिते पाटील यांना साथ दिली. लोकसभेत मोहिते पाटील यांचा विजय झाला. त्यानंतर शरद पवार गटातून जानकरांना माळशिरसमधून उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. त्यावर माहविकास आघाडीच्या जागावाटपानंतर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 2019 ला माळशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते Ram Satpute आणि राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांच्यात लढत झाली होती. त्यात सातपुते यांना 1 लाख 3 हजार 507 मते मिळाली तर जानकरांना 1 लाख 917 मते मिळाली होती. भाजपची मोठी यंत्रणा असूनही जानकरांचा निसटता पराभव झाला होता. त्यानंतर जानकरही भाजपमध्ये गेले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.