Jayant Patil : जयंत पाटलांची 'प्रदेशाध्यक्षपदातून' मुक्त करण्याची मागणी : मेळाव्याच्या भाषणातच राजीनामा देण्याचे सुतोवाच

NCP SP Politics News : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या 26 वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच मोठी मागणी केली आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Jayant Patil, Sharad Pawar
Jayant Patil, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आज पुण्यात दोन कार्यक्रम आयोजित होताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी सुरू आहे. या कार्यक्रमात दरम्यान बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदापासून बाजूला होण्याचे संकेत दिले आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षामध्ये भाकरी फिरवली जाणार असल्याचे संकेत यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची जम्बो कार्यकारणी वर्धापन दिनाच्या निमित्ताने जाहीर करण्यात येणार असल्याचा देखील बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला होण्याचे संकेत दिले आहेत.

बालगंधर्व रंगमंदिर येथे बोलताना जयंत पाटील म्हणाले, तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था या प्रशासकाच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत. शेवटी सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं की निवडणुका घ्या. त्यानंतर निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला जातोय पर मात्र माझी शंका आहे की या निवडणुका होतील का नाही. मात्र जेव्हा होतील तेव्हा या निवडणुकांना ताकतीने लढण्यासाठी आपण सज्ज राहायचं असल्याचं जयंतराव पाटील म्हणाले.

Jayant Patil, Sharad Pawar
Jayant Patil Politics : विशाल पाटलांना येणाऱ्या ऑफरवर जयंत पाटलांची गुगली; म्हणाले, 'ते अपक्ष, त्यांनीच...'

सध्याच्या काळामध्ये महत्त्वाच्या प्रश्नावरून लोकांचं लक्ष विचलित करायचा असेल तर पवार साहेबांना शिव्या घालायच्या, त्यांच्या विरोधात बोलायचं त्यामुळे माध्यम दिवसभर हाच विषय दाखवतात आणि त्यामुळे मूळ प्रश्न बाजूला राहतात. सध्या पवार साहेबांवर विनाकारण टीका करण्याचे काम सुरू आहे. शरद पवार यांनी ओबीसींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी कायम भूमिका घेतली आहे. पवार साहेबांना अजूनही टिके चे केंद्र बनवतात त्याचा अर्थ अभी भी पवार साहब का डर बाकी है. असं जयंत पाटील म्हणाले.

एकेकाळी भाजपचे फक्त दोनच खासदार निवडणूक जिंकले होते त्या पक्षाची आता देशभरामध्ये सत्ता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी घाबरलं नाही पाहिजे. या राज्याची लढाई आपण पुन्हा जिंकू शकतो असा मला विश्वास असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil, Sharad Pawar
Jayant Patil Politics : जयंत पाटलांच्या 'त्या' कृतीनं उडाला राजकीय धुरळा; पुन्हा महायुतीत जाण्याच्या चर्चांना उधाण

जयंत पाटील पुढे म्हणाले, मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. आज सात वर्षाचा कालावधीमध्ये मी प्रदेशाध्यक्ष आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक असल्याचं जयंत पाटील म्हणाले. असं म्हणतात बालगंधर्व रंगमंदिर येथे एकच गोंधळ झाला अनेक कार्यकर्त्यांनी उठून त्याला विरोध दर्शवला. त्यानंतर याबाबत पवार साहेब यांनी योग्यता निर्णय घ्यावा असं म्हणत जयंत पाटील यांनी भाषण आवरत घेतलं. प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला होण्याचे जयंत पाटील यांचे संकेत मात्र याबाबत आता नेमका काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com