
Kolhapur News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय केले असा सवाल केला. त्यावर शनिवारी (ता.25) राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.
माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी भाजप नेते अमित शाहांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, शरद पवार यांनी काम केले म्हणून ग्रामीण शेतकरी आर्थिक सक्षम बनला. कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना सर्व सुविधा देण्याचे काम केले. देशाच्या कानाकोपऱ्यात आजही विचारले तर कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांची ओळख असल्याचंही पाटील यांनी ठणकावून सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासगीत मान्य करायचे की शेतकऱ्याचे प्रश्न पवार जाणतात.पवार काय आहेत हे मोदींना माहिती आहेत. त्यांना पवार यांच्याबद्दल आदर आणि मान नक्कीच आहे. राज्यातील शेतकरी यावर विश्वास ठेवणार नाही. पवार यांना जितके टार्गेट करतील तितका मराठी माणूस पाठीमागे राहील. विधानसभा, लोकसभेत मोठा विजय मिळवून ही शरद पवार यांची भीती वाटते, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी टोले लगावले.
कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे १३% चे कर्ज आज ६ टक्क्यांवर आले, कर्जमाफी केली. यांचा सातबारा कोरा केला. पवार यांनी काय केले हे वारंवार विचारायची गरज नाही. केरळ च्या नारळ पासून काश्मीरक्या सफरचंद पर्यंत पिकांना योग्य हमीभाव दिला. शेतकऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये घेऊ नये यासाठी पवार यांनी प्रयत्न केला. वारंवार हा प्रश्न करून राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात पवारसाहेबांच्या प्रतिमेला आदराला तडा देण्याचे काम केंद्रीय मंत्री अमित शाह करत आहेत. आज देशाचे कृषिमंत्री कोण माहिती नाही, हमीभावसाठी आंदोलन सुरू आहे, अशी परिस्थिती असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
अमित शाह पवारांना काय म्हणाले होते...?
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सहकाराचे महत्व सांगताना मालेगावातून थेट शरद पवारांवर निशाणा साधला होता. ते म्हणाले, शरद पवार दहा वर्षे केंद्रात कृषी मंत्री होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, याचा मला प्रश्न पडतो. कृषिमंत्री असताना सहकारासाठी ठोस काम का करू शकले नाही. त्यांना सहकारासाठी स्वतंत्र खाते का निर्माण करता आले नाही. सहकार विभाग आजही अनेक समस्यांना सामोरे जातो आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी केवळ संघटित पद्धतीचे राजकारण केले. सहकाराच्या माध्यमातून मार्केटिंग केली. साखर कारखाने आणि संस्था मजबूत व्हाव्यात, असे काम झाले नाही. शेतकऱ्यांना अक्षरश: वाऱ्यावर सोडल्याचा घणाघात शहांनी केला. त्यामुळे आता शहांच्या या टीकेवर पवार कसा पलटवार करणार हे पाहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.