
Mumbai News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास दीड महिना उलटला आहे. अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणचा मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराड मोक्काचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातच आता या प्रकरणी दिवसांगणीस मोठे खुलासे होता आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण तापले असतानाच शनिवारी मुंबईतील मोर्चानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बजरंग सोनवणेंचा मोठा दावा केला आहे.
आमदार सुरेश धस (Suresh Dhas), खासदार बजरंग सोनवणे यांनी गेल्या महिनाभरापासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण लावून धरले आहे. या प्रकरणामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. या प्रकरणी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बीड, जालना, पुणे, धाराशिव व आता मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात आला. त्याच वेळी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा दावा केला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माईंड सापडला पाहिजे, तसेच ज्या मारेकऱ्यांना साथ दिली ज्यांनी आरोपींना पोलीस कस्टडीत रग पोहोचवली त्यांना सह आरोपी करण्याची मागणी यावेळी खासदार सोनवणे यांनी केली. त्यासोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बरेच काही दडलेले आहे. हे दडलेले सर्व काही बाहेर काढण्यासाठी 27 जानेवारीला पत्रकार परिषद घेणार असल्याचा दावा खासदार सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी केला.
वाल्मीक कराड ज्या गाडीतून पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये गेले ती गाडी कुणाची? याची चौकशी झाली पाहिजे. त्यासोबतच वाल्मिक कराड यांना आयसीयूमध्ये शिफ्ट केले त्यामुळे त्यांना नेमका आजार झालाय काय ? ज्या दिवशी न्यायालयीन कोठडी मिळते त्याच दिवशी कसे दुखते? असा सवाल देखील खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास दीड महिना उलटला आहे. अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध पोलीस पथकाकडून घेतला जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयडी व एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.