Sangli News: मोठी बातमी: जयंत पाटलांना अवघ्या 2 दिवसांत सलग दुसरा धक्का; ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांचे बंधूही ठरले अपात्र

Ishwarpur Nagaradhykasha Anandrao Malgunde: ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यावर झालेली अपात्रता कारवाई म्हणजे आमदार जयंत पाटील यांना त्रास देण्यासाठी मंत्रालयातून दबाव आणला जात असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे.
Ishwarpur Nagaradhyaksha Anandrao Malgunde Disqualified; Jayant Patil
Ishwarpur Nagaradhyaksha Anandrao Malgunde Disqualified; Jayant Patilsarkarnama
Published on
Updated on

Sangli News: ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी अपात्र ठरवल्यानंतर सोमवारी (ता.13 जुलै) मलगुंडे यांचे बंधू नगसेवक सुनिल मलगुंडे यांनाही अतिक्रमण व अनाधिकृत बांधकाम प्रकरणी नगरसेवकपदासाठी अपात्र ठरवले.

अवघ्या दोन दिवसांत राष्ट्रवादीला हा दुसरा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे पालिकेतील संख्याबळ आता दोनने कमी झाल्याने माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांना हा धक्का समजला जातो.

अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. घोष यांनी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील कलम 44 (1) (ई) अंतर्गत नगरसेवक सुनिल मलगुंडे यांना अपात्र ठरविण्याचा आदेश दिला आहे.

शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख घनश्याम उर्फ जयकर दिनकर जाधव यांनी पेठ - सांगली रस्त्यावरील बसस्थानकाजवळील मलगुंडे यांच्या हाॅटेल व लाॅजिंगची इमारत अतिक्रमणात असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

Ishwarpur Nagaradhyaksha Anandrao Malgunde Disqualified; Jayant Patil
Beed Municipal Council : राष्ट्रवादीच्या घड्याळाविरोधात बीड नगरपालिकेत कमळ-तुतारीची युती; सत्ताधाऱ्यांवर सर्वसाधारण सभा गुंडाळण्याची नामुष्की!

यात नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व नगरसेवक सुनिल मलगुंडे या दोघा बंधूंची नावे समाविष्ट होती. दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता.

आज नगरसेवक सुनिल मलगुंडे यांनाही अपात्र ठरवण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश मान्य नसल्यास आदेश प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील दाखल करण्याची मुभा संबंधितांना देण्यात आली आहे.

Ishwarpur Nagaradhyaksha Anandrao Malgunde Disqualified; Jayant Patil
Shrirampur Band : श्रीरामपूर हत्याकांडानंतर संताप; बंद दुसऱ्या दिवशीही कायम, 'बेग टोळी'वर मकोका लावा, आमदार ओगले कडाडले

ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यावर झालेली अपात्रता कारवाई म्हणजे आमदार जयंत पाटील यांना त्रास देण्यासाठी मंत्रालयातून दबाव आणला जात असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे.

नगराध्यक्षांच्या वकिलांनी मांडलेली बाजू अजिबात विचारात न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी दबावातून अवघ्या तीन ओळीत आदेश काढून हा अन्यायकारक निकाल दिल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आली आहे.

या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढा देऊ आणि तो जिंकू, असा इशारा देत जिल्हा प्रशासनाने केलेल्या या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला. नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे म्हणाले की, निवडणूक झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत शहरात मोठी कामे झाली आहेत. मी दुसऱ्यांदा नगराध्यक्ष झालो असून शहरात माझे स्वतःचे किंवा माझ्यामुळे अन्य कोणाचेही अनधिकृत अतिक्रमण नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com