Sangli Congress News : जयंत पाटलांचा सांगलीत काँग्रेसला धक्का; नगरसेवकाने घेतली तुतारी हाती

Political News : महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरु असताना सांगलीमधील नगरसेवकाने काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत तुतारी हाती घेतली आहे.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangali News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला होता. महाविकास आघाडीमुळे महायुतीला महाराष्ट्रातील 48 पैकी 17 जागी विजय मिळवता आला होता. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण तापत चालले आहे. त्यातच महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरु असताना सांगलीमधील नगरसेवकाने काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत तुतारी हाती घेतली आहे.

सांगली जिल्हयात लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) बॅकफुटला असल्याची चर्चा रंगली होती. विशेषतः सांगलीत काँग्रेस बंडखोर तर हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली. त्यामुळे वातावरण बदलले असल्याची चर्चा रंगली होती. दुसरीकडे वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवार गटाचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचा सांगली मतदारसंघातील प्रभाव कमी झाल्याची चर्चा सुरू होती. (Sangli Congress News )

लोकसभेला हातकणंगले मतदारसंघात जयंत पाटील यांना फारशी मदत करू शकले नाहीत आणि सांगलीमध्ये तर त्यांची खेळी केली. त्यामध्ये इथे फसले आणि विश्वजीत कदम यांनी त्यांना शह दिला. या सर्व पार्श्वभूमीवर विविध पक्षातील महत्त्वाचे कार्यकर्ते फोडून आपली पुन्हा ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी सुरू केला असल्याचे सांगली महापालिकेतील नगरसेवक अभिजीत भोसले यांच्या प्रवेशाने स्पष्ट झाले आहे.

सांगली महापालिकेतील नगरसेवक अभिजीत भोसले हे काँग्रेसचे म्हणजे मदन पाटील गटाचे नगरसेवक होते. त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने आता वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे.

Jayant Patil
Dhanjay Munde News : धनंजय मुंडे म्हणाले, 'ज्या गोष्टी घडायला नको त्या घडल्या, पण आता...'

सांगलीचे नगरसेवक अभिजीत भोसले यांनी राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता काँग्रेसमधील नाराज असलेल्या नगरसेवकाने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या प्रवेशामुळे येथील वातावरण बदलण्यास सुरुवात होणार का? याची चर्चा जॊरात रंगली आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Jayant Patil
Raj Thackeray : 'महाराष्ट्राचं सोनं लुटलं जातय अन् आपण आपट्याची पानं वाटतोय'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com