Dhanjay Munde News : धनंजय मुंडे म्हणाले, 'ज्या गोष्टी घडायला नको त्या घडल्या, पण आता...'

Political News : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच उमेदवाराने जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रचाराच्या निमित्ताने सर्वच जण आता झाले गेले वाद विसरून आता कामाला लागले आहेत.
pamakja munde, dhanjay munde, pritam munde
pamakja munde, dhanjay munde, pritam munde Sarakarnama
Published on
Updated on

Beed News : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच उमेदवाराने जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रचाराच्या निमित्ताने सर्वच जण आता झाले गेले वाद विसरून आता कामाला लागले आहेत. बीड लोकसभेसाठी महायुतीची उमेदवारी मिळाल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर दर्शनासाठी पहिल्यांदाच आल्या होत्या.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, माझ्यासाठी हा अतिशय भावनिक दिवस आहे. ताईंना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचे स्वागत खरंतर मी जिल्ह्याच्या बॉर्डरवर करायला सांगितलं होतं. मात्र त्यांनी सांगितलं तू पालकमंत्री आहेस. त्यामुळे तू घरी थांब. मी घरी येणार आहे भेटायला. पण शेवटी घरातला मी मोठा आहे.. आजच्या भावनिक दिवशी कसलाही प्रोटोकॉल आणि पालकमंत्री पदाचा विषय नाही. माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली, आमचं स्वागत करण्यासाठी मोठा भाऊ म्हणून असणार आहे.

pamakja munde, dhanjay munde, pritam munde
Pankaja Munde On Manoj Jarange : पंकजा मुंडेंनी केलं जरांगे पाटलांचं अभिनंदन; काय आहे कारण?

ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या घडल्या आहेत. पण आता आनंद वाहत असल्याचे सांगत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ज्यांना निवडणुकीत साधं मुलीला ग्रामपंचायतला देखील निवडून आणता आले नाही, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केलेल्या बजरंग सोनवणेंवर टीका केली.

आमचा प्रारब्ध होता, तो मात्र आज संपला आहे. आमच्या कुटुंबाचा संघर्ष संपला आहे. आज सर्व कुटुंब येथे एकत्र आहोत. आता कोणाचा प्रारब्ध चालू करायचा ? ते आम्ही तिघे मिळवून ठरवणार असे म्हणत धनंजय मुंडे यांनी विरोधकांना इशारा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, बीडमध्ये मोठ्या प्रमाणात स्वागत झाल्यानं मार्ग गुपित ठेऊन गोपीनाथ गडावर यावं लागले. माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanjy Munde) यांना सांगितलं होतं, मी तुमच्या घरी येईल. आमच्या काकूच्या आशीर्वाद घेण्यासाठी अण्णांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुम्हाला विनंती करण्यासाठी, तुम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख आहात, तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही मला मदत करा.

सगळ्यांना मी मदत मागितली अन आपल्या घराला गृहीत धरल तर हे बरोबर दिसणार नाही..परंतु आज गोपीनाथ गडावर भाऊ आलाय पालकमंत्र्याला भेटायला मी घरी जाणार आहे, खासदार आणि पालकमंत्री माझ्या स्वागतासाठी आले, किती हेवी उमेदवार आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी (Pankja Munde) दिली.

pamakja munde, dhanjay munde, pritam munde
Pankaja Munde News : मुंडे बहीण-भावातील संघर्षाला पूर्णविराम; दहा वर्षानंतर गोपीनाथ गडावर आले एकत्र !

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com