Jaykumar Gore News: जयकुमार गोरेंनी नुसतं पाणीच नाही वळवलं, तर पाच गावांतील मतदानही फिरवलं

Phaltan Politics: औंध उपसा सिंचन योजनेत वंचित पाच गावांचा समावेश करण्याचा शब्द ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला होता. त्यासाठी स्थानिक शिष्टमंडळाची राज्यपाल, मुख्यमंत्री, जलसंपदामंत्र्यांबरोबर बैठक घेऊन या योजनेच्या प्रस्तावाला गती देण्याचे प्रयत्न केले होते.
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

पुसेगाव, ता. २५ : औंध उपसा सिंचन योजनेत नव्याने खटाव तालुक्यातील पाच गावांचा समावेश झाल्याने आता ही योजना एकूण २१ गावांसाठी लाभदायी ठरणार आहे. पाच वाढीव गावांचा गावांचा औंध योजनेत समावेश करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाचे पत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना प्राप्त झाले आहे.

औंध उपसा सिंचन योजनेत वंचित पाच गावांचा समावेश करण्याचा शब्द ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी दिला होता. त्यासाठी स्थानिक शिष्टमंडळाची राज्यपाल, मुख्यमंत्री, जलसंपदामंत्र्यांबरोबर बैठक घेऊन या योजनेच्या प्रस्तावाला गती देण्याचे प्रयत्न केले होते. पाच वाढीव गावांसह आता या योजनेत औंध, त्रिमली, कुमठे, गणेशवाडी, जायगाव, नांदोशी, गोपूज, करांडेवाडी, खबालवाडी, गोसाव्याचीवाडी, पळशी, लांडेवाडी, वरुड, खरशिंगे, अंभेरी, वाकळवाडी, कोकराळे, भोसरे, लोणी, धकटवाडी आणि सिद्धेश्वर कुरोली या २१ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

औंध उपसा सिंचन योजनेद्वारे औंध परिसरातील गावांना शेतीसाठी पाणी देण्याकरिता कण्हेर जलाशयातून सव्वा टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. या पाण्याद्वारे ८ हजार ८८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजनेसाठी पाणी उपलब्धता झाली असून, उर्ध्वगामी नलिका, पंप विसर्ग, पूर्व संभाव्यता अहवाल, पंपिंग मशिनरी, परिगणाकांना स्थायी समितीची मान्यता मिळाली आहे.

मुख्यमंत्र्यांची Devendra Fadnavis मान्यता मिळून प्रकल्पाची पीक रचनाही मान्य करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ४९३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने जून २०२४ मध्ये या योजनेला मान्यता दिली आहे.

Jaykumar Gore
Ravindra Dhangekar News: जैन बोर्डिंगच्या जागेचा वाद 'दिल्ली दरबारी'; PM मोदींना पत्र पाठवत धंगेकरांची सर्वात मोठी घोषणा

राज्यपालांनी मान्यता दिलेल्या या योजनेत पाच वाढीव गावांचा समावेश करून एकूण २१ गावांच्या योजनेस ८ ऑक्टोबर २०२५ रोजी शासनाची मान्यता मिळाल्याचे पत्र जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना दिले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची मान्यता मिळताच या योजनेची निविदा प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे मंत्री गोरे यांनी सांगितले.

Jaykumar Gore
Padalkar Vs Patil: भाजपच्या पडळकरांचा इशारा ठरला 'फुसका बार'; राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं धुराडं पेटलं

वंचित गावे सिंचनाखाली

उरमोडी, जिहे- कठापूर, तारळी योजनांचे पाणी माण- खटावमधील मतदारसंघात येत आहे. आता टेंभू योजनेची कामे वेगाने सुरू आहेत. वाढीव आंधळी उपसा सिंचन योजना पूर्णत्वाला गेली आहे. जल फेरनियोजनात जिहे-कठापूर योजनेला वाढीव पाणी मिळवले आहे. त्यातून माणमधील वंचित गावे सिंचनाखाली येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com