

Satara, 31 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता. 01 नोव्हेंबर) मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. माणमध्ये सोसायटी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि त्यांचे बंधू शिवसेनेचे शेखर गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मनोज पोळ यांच्यात काट्याची तिरंगी लढत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री गोरे यांनी जलमंदिर पॅलेसवरून जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. मतांच्या बेरजेसाठी ही भेट झाल्याची खमंग चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता. ०१ नोव्हेंबर) मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांत खलबते सुरू आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांत निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर तासभर चर्चा झाली.
सातारा जिल्हा बॅंकेच्या मतदानासाठी केवळ एक दिवस उरला आहे, त्यामुळे मतांची बेरीज करून सेफ होण्यासाठी सर्वच प्रमुख लढती असलेल्या नेत्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज भेट घेतली. यावेळी आमदार धैर्यशील कदम, महायुती समन्वयक सुनील काटकर, विराज शिंदे, विठ्ठल बलशेटवार, विनीत पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा झाली. ग्रामविकासमंत्री गोरे यांनी मतांच्या बेरजेसाठी ही भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे.
निदान आमचा भत्ता तरी चालू ठेवा...
जिल्हा बॅंकेच्या कार्यकारी समितीची सभा झाली. या सभेसाठी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहिले होते. संचालक मंडळाच्या सभागृहात गेल्यावर ते थेट अध्यक्षांच्या खुर्चीत जाऊन बसले. त्यावेळी सर्व संचालकांच्या उपस्थितीत खासदार उदयनराजेंनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना ‘निदान आमचा भत्ता तरी चालू ठेवा,’ असे म्हणताच एकच हशा पिकला.
या वेळी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष अनिल देसाई, प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, प्रदीप विधाते, शिवरूपराजे खर्डेकर, राजेंद्र राजपुरे, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, तसेच संचालक व अधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.