Satara DCC Bank Result : जयकुमार गोरेंची सातारा Dccत दमदार एन्ट्री; शेखर गोरेंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही, राष्ट्रवादीला धक्का

Jaykumar Gore Victory In Man Constituency : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत माण सोसायटी मतदारसंघातून जयकुमार गोरे यांनी ३९ मतांनी विजय मिळवला. त्यांचे बंधू शेखर गोरे यांना मात्र दुहेरी आकडाही गाठता आला नाही
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 03 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या १२ जागांची मतमोजणी आज सकाळी आठपासून सुरू आहे. सर्वाधिक चर्चा झालेल्या माण सोसायटी मतदारसंघातून भाजप नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे तब्बल ३९ मतांनी विजयी झाले आहेत. सर्वाधिक चर्चा झालेले त्यांचे बंधू शेखर गोरेंना मताचा दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

जिल्हा बॅंकेच्या २१ जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १२ जागांसाठी रविवारी ९८ टक्के मतदान झाले होती, त्याची मतमोजणी आज सकाळी आठपासून सुरू आहे. त्यातील माण सोसायटी गटातून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ३९ मतांनी विजय मिळवित जिल्हा बॅंकेत दमदारपणे एन्ट्री केली आहे.

माण सोसायटी गटातून मंत्री जयकुमार गोरे यांना ५३ मते मिळाली आहे. त्यांचे बंधू आणि शिवसेना नेते शेखर गोरे यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यांना केवळ ७ मतांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोजकुमार पोळ यांना १४ मते पडली आहेत, त्यामुळे गोरे यांनी पाहिल्याच निवडणुकीत जिल्हा बॅंकेत झोक्यात प्रवेश केला आहे.

Jaykumar Gore
Satara Dcc Bank Result : भाजपला दुसरा धक्का : पाटणनंतर फलटणमध्येही पराभव, शिवसेनेच्या संजीवराजेंनी समशेरसिंह निंबाळकरांना अस्मान दाखवले

दरम्यान, पाटण सोसायटी मतदारसंघातून पालकमंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी विद्यमान संचालक तथा भाजप नेते सत्यजित पाटणकर यांना पराभूत करत मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे काढले आहे. या निवडणुकीत शंभूराज देसाई यांना ५८ मते मिळाली असून सत्यजित पाटणकर यांना ४६ मतांवर समाधान मानावे लागले आहे.

Jaykumar Gore
Satara Dcc Bank Result : शंभूराज देसाईंनी उट्टे काढले : भाजपच्या पाटणकरांचा पराभव करत जिल्हा बॅंकेत मारली बाजी

फलटण सोसायटी गटातून शिवसेनेचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपचे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर दणदणीत मतांनी पराभव केला आहे. या लढतीत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना ७१ मते मिळाली आहेत, तर समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना ६० मतं पडली आहेत. या विजयाच्या निमित्ताने माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना धोबीपछाड दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.