Mohite Patil Vs Gore : रणजितसिंह मोहिते पाटलांच्या गाठीभेटींची जयकुमार गोरेंनी उडवली खिल्ली : म्हणाले, ‘पावसाळ्यातील छत्र्या...’

Solapur Dcc Bank Election 2026 : सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीला वेग आला आहे. 21 सप्टेंबरला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार असून जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपची रणनीती ठरण्याची शक्यता आहे. रणजितसिंह मोहिते पाटीलही सक्रिय आहेत.
Ranjitsinh Mohite Patil-Jaykumar Gore
Ranjitsinh Mohite Patil-Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 20 September : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने रंगत येताना दिसत आहे. प्रशासकीय पातळीवर उद्या सोमवारी (ता. २१ सप्टेंबर) प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. सोलापूर दौऱ्यावर असलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची बॅंक निवडणुकीसाठी रणनीती ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजपचे माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही गाठीभेटीच्या माध्यमातून नवा राजकीय पट आखण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यावरची पालकमंत्री गोरे यांनी खिल्ली उडवत त्यांना फारशी किंमत देणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार राजेंद्र राऊत, सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजपचे आजी माजी आमदार, प्रमुख नेतेमंडळींची बैठक सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात घेतली होती. मात्र, त्यात दोन नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे, भाजपत असूनही पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर असलेले माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने गाठीभेटी सुरू केल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी सोलापूर शहरातील प्रमुख नेतेमंडळी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. त्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी पालकमंत्र्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला.

Ranjitsinh Mohite Patil-Jaykumar Gore
Solapur Politic's : गोरेंचा गणपती सोलापूर जिल्हा बॅंकेचे इच्छुक, नेतेमंडळींना पावणार; आजी-माजी आमदार, पदाधिकारी, अधिकाऱ्यांची बोराटवाडीत हजेरी...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांना त्याबाबत विचारले असता त्यांनी मोहिते पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ‘पावसाळा आला की अशा छत्र्या उगवत राहतात,’ असा टोला लगावत गोरे यांनी मोहिते पाटलांच्या भेटीगाठींना आपण फारसे महत्त्व देत नसल्याचे स्पष्ट केले.

Ranjitsinh Mohite Patil-Jaykumar Gore
Babasaheb Patil-Solapur Dcc Bank : खुद्द सहकारमंत्र्यांनाच दणका बसताच सोलापूर ‘डीसीसी’तील माजी संचालकांचे धाबे दणाणले

सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वतःच्या हिमतीवर लढवणार आहे. या निवडणुकीमध्ये समविचारी लोक सोबत आले तर त्यांनाही बरोबर घेण्याचा आमचा विचार आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत भाजप ही निवडणूक लढवून जिंकेल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बोलून दाखवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com