-विशाल गुंजवटे
Maan Political News : भाजपचे दबंग आमदार जयकुमार गोरे यांनी आपल्या नेतृत्व,कर्तृत्वाच्या जोरावर जिल्ह्याच्या राजकारणात माण मतदारसंघाचा दबदबा ठेवला आहे. ज्या जनतेने हे कार्य करण्याची संधी दिली. त्या माण, खटावच्या जनतेला ते कधीही विसरत नाहीत. आपल्या जनतेशी, कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधता यावा. त्यांच्यासोबत एक दिवस घालवता य दिवाळीचे औचित्य साधत स्नेहमेळावा आयोजित केला होता. बोराटवाडीत घेतलेल्या स्नेहमेळाव्याला माण, खटावच्या जनतेने व कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत मेळाव्यात रंगत आणली.
जयकुमार गोरे Jaykumar Gore यांच्यावर प्रेम करणाऱ्या माण, खटावच्या Maan Politics जनतेने त्यांना तिसऱ्यांदा आमदार केल्याने त्यांना विजयाची हट्रिक साधता आली. मतदारसंघात भाजप पक्षाची ताकद वाढवताना त्यांनी जिल्ह्यातही आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पक्ष वाढवण्याचे काम केले आहे. त्यांच्या याच कार्यामुळे जिल्ह्यात एखादा निर्णय घेताना माणला विश्वासात घेतल्याशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही.
एवढी राजकीय ताकद त्यांनी निर्माण करून माणचा मान वाढवण्याचे काम करून दाखवले आहे. जिल्ह्यात भाजप पक्षाचा विस्तार करतानाही जिल्ह्याची सूत्रे आपल्या ताब्यात ठेवत पक्षाची मजबूत बांधणी करून दाखवली आहे. याच कार्यामुळे त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपली व माण मतदारसंघाची वेगळी ओळख बनवली आहे.
माण, खटावच्या जनतेचे प्रेम व आशीर्वादामुळेच ते काही महिन्या पूर्वी झालेल्या अपघातातूनही वाचले आहेत. ते यातून लवकर बरे व्हावेत व त्यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी जनतेकडून नवस, उपासना,पूजाआर्चा केल्या जात होत्या. जनतेचे व त्यांचे वेगळेचे नाते निर्माण झाल्याने तेही जनतेच्या सुखदुखात कायमच सहभागी असतात. Maharashtra Political News
यासाठीच दिवाळीचे निमित्त साधत स्नेहमेळावा आयोजित केला. सकाळपासून भरलेल्या या स्नेह मेळाव्यात आमदार जयकुमार गोरे जनतेला, कार्यकर्त्यांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देत होते. याप्रसंगी उपस्थित सर्वजण दिवाळी फराळाचा आस्वाद घेत आपल्या नेत्याशी संवाद साधत होते.याप्रसंगी जिल्ह्यातील विविध मान्यवर तसेच माण खटाव तालुक्यातील जनता,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.