K P Patil and A Y Patil : राधानगरी मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता, पाटील मेहुणे अन् पाहुणे काय करणार?

K P Patil And A Y Patil kolhapur Vidhan Sabha Politics : मतदारसंघात महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार? बाजी कोण मारणार? याकडे लक्ष लागले आहे.
K  P Patil And A Y Patil
K P Patil And A Y PatilSarkarnama
Published on
Updated on

आगामी विधानसभा राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाला मिळणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात आव्हान निर्माण करण्यासाठी ही उमेदवारी राधानगरी मतदारसांघातून ठाकरे गटाला देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार? बाजी कोण मारणार? याकडे लक्ष लागले आहे.

या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडे शिंदे (Shivsena) गटाला आव्हान देण्यासाठी तुल्यबळ उमेदवार नाहीये. त्यामुळे त्यांना उसना उमेदवार घ्यावा लागण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाची उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी मेहुण्या-पाहुण्यात म्हणजेच माजी आमदार के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

K  P Patil And A Y Patil
Shivsena UBT : नागपुरात ठाकरे सेनेच्या वाट्याला दोन जागा; उमेदवारही लागले कामाला

महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्यासाठी ‘के.पीं.’नी चार दिवस मुंबईत तळ ठोकला होता. तर ए. वाय. पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) व उद्वव ठाकरे यांची भेट घेतली आणि ते नुकतेच कोल्हापूरला परतले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेरच्या क्षणी हातकणंगले मतदारसंघात ठिय्या मारल्याने खासदार धैर्यशील माने यांनी विजय खेचला. त्याच पद्धतीने मुख्यमंत्री शिंदे यांचे विधानसभेलाही जिल्ह्यात विशेष लक्ष राहण्याची शक्यता आहे.

कालच मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार आबिटकर यांना बळ देण्यासाठी भुदरगड येथे जाहीर सभा घेतली. भुदरगड तालुक्यात शिवसेनेचे प्राबल्य आहे, तर राधानगरी तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला महाविकास आघाडीची उमेदवारी उध्दव ठाकरे गटाला देऊन एकत्रित मते खेचण्याची नवी खेळी महाविकास आघाडीचे नेते खेळत आहेत. राधानगरी-भुदरगड मतदारसंघात भाजपची वातावरण कमी आहे. त्यामुळे अजून तरी भाजपनी येथे विशेष लक्ष अद्यापतरी दिलेले दिसत नाही.

K  P Patil And A Y Patil
Prashant Paricharak : भालके राहिले बाजूला परिचारकांसाठी शरद पवारांच्या ‘NCP’कडून चाचपणी?

पी. एन. यांचा शब्द काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी

भोगावती व लोकसभा निवडणुकीत पी. एन. पाटील यांचा शब्द प्रमाण मानून ‘ए वाय पाटील ' यांनी आपली ताकद काँग्रेसच्या पाठीशी उभी केली होती. ‘पी एन' यांनी न्यू पॅलेसवर जाहीर मेळाव्यात ‘ए. वाय' तुम्ही पुढील राजकारणाची काळजी करू नका, माझे व सतेज पाटील यांचे ठरले आहे, हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. यावरून ‘ए. वाय' यांना महाविकास आघाडीची उमेदवारी निश्चित झाली होती. त्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी ए. वाय. उमेदवारी मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाविकासचे प्लॅनिंग सुरु, पक्षातील जेष्ठ नेत्यांना साकडे

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन 'ए. वाय' यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी मागणी केली आहे. राधानगरी तालुक्यात मतदार संख्या अधिक असतानाही तालुक्याला पंचवीस वर्षे प्रतिनिधित्व मिळाले अशी खंत व्यक्त करत कार्यकर्त्यांनी सतेज पाटलांकडे साकडे घातले आहे. या शिष्टमंडळात ‘भोगावती’चे आजी-माजी संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com