Kagal Constituency : कागलमधील घाटगे-मुश्रीफ लढतीत तिसऱ्या भिडूची एंट्री, निवडणुकीसाठी ठोकला शड्डू

Samarjeetsinh Ghatge Hasan Mushrif Raju Shetty : पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाडगे यांच्यात सरळ लढत होणार असे चित्र होते. मात्र, तिसरा उमेदवारही निवडणूक रिंगणात असणार आहे.
Hasan Mushrif | Samarjeetsinh  Ghatge
Hasan Mushrif | Samarjeetsinh GhatgeSarkarnama
Published on
Updated on

Kagal Constituency 2024: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल विधानसभा मतदारसंघात लक्षवेधी घडामोडी घडत आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाडगे यांच्यात सरळ लढत होणार असे चित्र होते.

मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या दोघांचे टेन्शन वाढवले आहे. कागल मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेले समरजीत घाटगे यांनी नुकतीच माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोनच दिवसात शेट्टी यांनी कागलमधून उमेदवार देणार असल्याची घोषणा केल्यानंतर या भेटी मागचे तर्क वितर्क लढवले जात आहेत.

Hasan Mushrif | Samarjeetsinh  Ghatge
Dhanorkar Vs Wadettiwar : काँग्रेसमध्ये दुफळी! धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार वाद पेटला; बालेकिल्ल्यात जाऊन थेट पाडण्याची भाषा

राजू शेट्टी यांनी नुकताच कागल विधानसभा मतदारसंघातील गोरंबे येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. राजू शेट्टी म्हणाले, कागल विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाच्या प्रतिनिधीची गरज आहे.

विधानसभेत आपल्या हक्काचा प्रतिनिधी हवा. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी मागे न राहता कागल विधानसभा लढ़विण्यासाठी सज्ज व्हावे. यासाठी संपूर्ण ताकद आपल्या उमेदवाराच्या पाठीशी लावू.

स्वाभिमानीची ताकद किती?

कागल विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद पुरेशी नसली तरी त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या मतदारसंघातील 127 गावात शेतकरी संघटनेतील जुने कार्यकर्ता आणि शेतीची जाण असलेला शेतकरी शेट्टी यांच्यासोबत आहेत.

स्वाभिमानी आंदोलन करणार

कागल मतदारसंघात माजी खासदार संजय मंडलिक, मंत्री हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांचे साखर कारखाने आहेत. त्यामुळे स्वाभिमानीने या जागेवर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी डाव टाकला आहे.मागील हप्त्यातील पैसे देण्यात कारखाने अद्यापही मागे असल्याने या विरोधात आवाज उठवण्यासाठी शेट्टी यांनी देखील रणशिंग फुंकण्याची तयारी ठेवली आहे.

(Edited By Roshan More)

Hasan Mushrif | Samarjeetsinh  Ghatge
Supriya Sule : सरकारचा वेग 'गोगलगायी' एवढा? कोणत्या उपमुख्यमंत्र्यांची कबुली; सुप्रिया सुळेंनी टायमिंग साधलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com