Sanjay Mandlik On Mushrif: नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मंडलिकांची मुश्रीफांवर डागली तोफ; म्हणाले, 'त्यांच्याबद्दल मला...'

Kagal And Murgud NagarPalika Election: कागल आणि मुरगूड नगरपालिकेचा निवडणुकीनंतर महायुतीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्यातील टोकाचा संघर्ष मिटेल असे वाटत होते. पण आता कागलच्या राजकारणाचे भवितव्य ठरणारे वक्तव्य माजी खासदार संजय मंडलिक यांनी केले.
Hasan Mushrif, Sanjay Mandlik
Hasan Mushrif, Sanjay MandlikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कागल आणि मुरगूड नगरपालिकेचा निवडणुकीनंतर महायुतीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्यातील टोकाचा संघर्ष मिटेल असे वाटत असताना कागलच्या राजकारणाचे भवितव्य ठरणारे वक्तव्य माजी खासदार संजय मंडलिक यांनी केले. मुश्रीफ यांनी संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करून असे सांगितल्यानंतर मंडलिक यांनी थेट टीका केली.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल मला काहीच बोलायचे नाही. कारण त्यांच्या विचारांवर मी राजकारण करत नाही. मुश्रीफ काय हिटलर लागून गेले नाहीत? मुश्रीफ यांच्याबद्दल विचारू नका, मरू देत तिकडे, अशा शब्दात मंडलिक यांनी भावना व्यक्त केल्या.

कागलमध्ये शिवसेनेचे उमेदवारच उभारणार नाहीत, असे वातावरण केले. परंतू आम्ही उमेदवार उभा करून टक्कर देत ३३ टक्के मते मिळविली. कागलमध्ये मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांची युती मतदारांना पसंत पडली नाही. शिवसेनेला मिळालेल्या मतांवरून कागलमध्ये पुढे होणार्या निवडणुकीची चुणूक मतदारांनी दाखवून दिली आहे. मुरगूडमध्ये विजय अपेक्षित होता. परंतू विरोधी बाजूंकडून पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. त्यामुळे मताधिक्य कमी मिळाले. असा दावा मंडलिक यांनी केला.

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) सोयीचे राजकारण करत आहेत. कुणाला घ्यायचे आणि कुणाला नाही हे ते स्वतः ठरवतील. त्यांच्या मनाचे श्लोक मी कशाला बोलू. केडीसी बँकेतही त्यांनी असाच प्रकार केला होता. हे नको, ते नको म्हणून शेवटी महायुती केली. आता महायुतीचे प्रमुख आहेत तर त्यांनी त्या पध्दतीने विचार केला पाहिजे. त्यामुळे आमचे अस्तित्व दाखविण्याचा हा विषय आहे.

Hasan Mushrif, Sanjay Mandlik
NagarPalika Nikal : CM फडणवीसांचा पैलवान चितपट : भाजपच्या माजी खासदारच्या पत्नीचा पराभव; आधी लोकसभा गेली आता नगरपालिकाही गमावली

वास्तविक मंत्री मुश्रीफ यांच्याकडून आम्हाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. नगरपालिका निवडणूक हे त्याला निमित्त आहे. यापूर्वी गोकुळच्या निवडणुकीत विरेंद्र मंडलिक यांचा पराभव केला. त्याचे विश्लेषण करताना माझ्या लक्षात आले की कुर्हाडीचा दांडा गोतास काळ... ही भीती मुश्रीफ यांना आहे. कदाचित मंडलिक पुढच्या राजकारणात आपल्याला अडचणीचे ठरू शकतात असे वाटत असल्याने मुश्रीफ हे निर्णय घेत असतील, असेही मंडलिक यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com