
अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. या निवडणुकांकडे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांची पूर्व तयारी म्हणून पाहिले जात आहे. अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कळस बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत जिल्हा परिषदेतील अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व 13 जागांवर एकहाती विजय मिळवत भाजपचा झेंडा फडकला आहे. ( Kailasrao Wakchaure maintains fort: BJP's flag on Kalas Budruk's society )
कळस सोसायटीच्या निवडणुकीत कैलासराव वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळ स्थापन करून संगमनेर साखर कारखानाचे माजी संचालक सीताराम वाकचौरे, डी. टी. वाकचौरे, संचालक संभाजी वाकचौरे, भाजपचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विजय संपादित झाला आहे. (Kalas Budruk Co-operative Society election News)
विजयी उमेदवार - विद्यमान अध्यक्ष विनय विष्णू वाकचौरे, उपाध्यक्ष अशोक बजाबा वाकचौरे, बाजीराव किसन वाकचौरे, अशोक पुंजा वाकचौरे, रवींद्र रामचंद्र वाकचौरे, शिवाजी बाबुराव वाकचौरे, एकनाथ गणपत ढगे, प्रकाश मुरलीधर ढगे, कमलाकर यादव वाकचौरे, शारदा दौलत वाकचौरे, सुमन बबनराव वाकचौरे हे विजयी झाले तर प्रकाश बबन आल्हाट व निवृत्ती माधव मोहिते हे बिनविरोध निवडून आले आहेत.
विजयानंतर कार्यकर्ते यांनी फटाके वाजवीत व गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला. प्रा. विवेक वाकचौरे यांनी आभार मानले. या निवडणुकीत विजयासाठी सागर वाकचौरे, नामदेव निसाळ, सूर्यकांत ढगे, भरत वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे, सदस्य दत्तात्रय वाकचौरे, बाळासाहेब वाकचौरे, केतन वाकचौरे, सोसायटी चे संचालक शांताराम वाकचौरे, निलेश बिबवे, प्रवीण वाकचौरे, पांडुरंग वाकचौरे, रामदास वाकचौरे, सुभाष कानवडे, गणेश रेवगडे, रायभान कानवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेरे यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून विश्वास काळे यांनी कामकाज पाहिले. विजयी उमेदवारांचा माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड यांनी गौरव केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.