Tukaram Munde Transfer : तुकाराम मुंडेंच्या बदलीने भाजपच्या 'त्या' प्लॅनला लागला ‘ब्रेक’!

भाजपला हा राजकीय मुद्दा करायचा असला तरी यात महसूलसह इतर अधिकाऱ्यांची लॉबीदेखील अडकणार होती.
Tukaram Munde
Tukaram MundeSarkarnama
Published on
Updated on

बीड : आरोग्य विभागाच्या कुटुंबकल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांच्या बदलीमुळे आरोग्यकर्मींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, यामुळे भाजप (BJP) थिंक टँकचा धोरणात्मक प्लॅन ‘पॉझ’ झाला आहे. मुंडे यांच्या नेमणुकीमागे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात कोविड उपाययोजनांच्या नावाखाली राज्यभरात झालेली अनियमितता चव्हाट्यावर आणून राजकीय वातावरण तापवत आघाडी विरोधात वातावरण तापविण्याचा प्लॅन होता. (Tukaram Munde's transfer breaks BJP's plan)

आघाडी सरकार येताच कोविड संसर्गाची सुरुवात झाली. केंद्र सरकारने व्हेंटिलेटर्स व इतर उपकरणे पुरविल्यानंतरही राज्य सरकारने जिल्हा नियोजन समित्यांच्या निधीसह आपत्ती निवारण, गौण खनिजाचा निधी या उपाययोजनांसाठी वळविला. या काळात राज्यभरात सर्वच विकास योजनांना खीळ बसली. दरम्यान, संसर्गजन्य परिस्थितीमुळे सरकारला या मुद्द्यांमुळे सहानुभूतीही मिळाली. आताही महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष कोविड काळातील उपाययोजनांचा मुद्दा पुढे करतात.

Tukaram Munde
Maharashtra-Karnataka Border Dispute : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची फुशारकी : म्हणे ‘महाराष्ट्राची याचिका सुप्रीम कोर्टात टिकणार नाही..’

दरम्यान, मुंबई, पुणेसारख्या मेट्रो सिटींमध्ये त्या काळात उभारलेल्या हजारो खाटांच्या जंबो कोविड सेंटरसह इतर अनियमिततांबाबत तत्कालीन विरोधी पक्ष भाजपने आरोपही केले. मात्र, भविष्यात राज्यभरातील कोविड काळात उपाययोजना करताना कंत्राट देताना झालेली अनियमितता, ठराविक कंत्राटदारांनाच कामे, अपूर्ण कामे असताना देयक अदा केल्याचे प्रकार, बाजारभावापेक्षा कैकपट अधिक दराने वस्तूंची खरेदी, आवश्यकता नसताना खरेदी अशा बाबी अत्यावश्यक व कोविडच्या नावाखाली झाल्याचे भाजपच्या थिंक टँकचे मत आहे. त्यामुळे या बाबी कागदावर आणण्याचे काम तुकाराम मुंडे यांच्यासारखाच अधिकारी करू शकतो हे हेरूनच त्यांची आरोग्य विभागाच्या कुटुंबकल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

Tukaram Munde
Maharashtra-Karnataka Border Dispute कर्नाटक सरकारने महाराष्ट्राला पुन्हा डिवचले : जत तालुक्यासाठी पाणी सोडले

भविष्यात या सर्व बाबींचे लेखा परीक्षण करून ‘आघाडीने कोविडच्या नावाखाली कशी उधळपट्टी केली’ हा राजकीय मुद्दा करण्याचा प्लॅन होता. त्यादृष्टीने राज्यभरातील अनेक जिल्ह्यांत कोविड काळातील खर्चाचे लेखा परीक्षणदेखील सुरू झाले होते.

Tukaram Munde
Women CM : ठाकरेंच्या मनातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण...? सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे की पंकजा मुंडे?

मुंडेंच्या विरोधात वातावरण निर्मिती

भाजपला हा राजकीय मुद्दा करायचा असला तरी यात महसूलसह इतर अधिकाऱ्यांची लॉबीदेखील अडकणार होती. मात्र, मुंडेंनी आरोग्य खाते भलतेच टाइट केले, अधिकारी-कर्मचारी त्यांच्याबद्दल नाराज असल्याचा मुद्दा अधोरेखित केला आणि मुंडेंच्या विरोधात वातावरण निर्मिती केली. त्यामुळे तुकाराम मुंडे यांची दोनच महिन्यांत बदली झाली. त्यामुळे भाजपच्या थिंक टँकच्या ‘महाविकास आघाडीच्या काळातील कोविडसारख्या संवेदनशील परिस्थितीत उधळपट्टी’ केल्याचे चव्हाट्यावर आणण्याचा प्लॅनला सध्या तरी ब्रेक लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com