

कराड नगरपालिकेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपचा दारूण पराभव झाला. माजी मंत्री बाळासाहेब पाटील आणि शिवसेनेचे स्थानिक नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या लोकशाही-यशवंत आघाडीने नगराध्यक्षपद व 20 जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वातील भाजपला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले.
पालिका राजकारणात लोकशाही आघाडीला प्रतिकूल स्थिती असताना माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पालिका निवडणुकीत स्थापन झालेल्या आघाडीचे नेतृत्व केले. लोकशाही-यशवंत आघाडीच्या नगराध्यपद व 20 उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक प्रभागात कोपरा सभा, व्यक्तिगतरीत्या संपर्क साधला. त्याचे फलित निकालामध्ये दिसले.
या निकालानंतर माजी मंत्री पाटील यांनी पुन्हा एकदा पालिकेत दमदार कमबॅक तर केलेच, त्याशिवाय भक्कम झालेल्या शहरातील भाजपसह आमदार डॉ.अतुल भोसले यांनाही धक्का दिला. पालिकेतील सत्तांतराचे गेमचेंजर म्हणून सिद्ध करताच राजकीय कंट्रोल पुन्हा एकदा आपल्याकडेच असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडींचे दूरगामी परिणाम शक्य आहेत.
गेल्या वेळी लोकशाहीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता. केवळ 6 नगरसेवकच निवडून आले. पालिकेत विरोधी बाकावर बसताना 5 वर्षांत वेगवेगळ्या विषयात सातत्याने बोटचेपे धोरण स्वीकारावे लागले. मुदत संपल्यानंतर व आत्ताच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर लोकशाहीची स्थिती तशी बिकटच होती. 6 महिन्यांपूर्वीपर्यंत उमेदवार कोण? अशीही चर्चा होती.
पण लोकशाही आघाडीने यशवंत आघाडीशी समझोता करत पालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी 30 जागांवर उमेदवार देत नगराध्यक्षपदासाठी राजेंद्रसिंह यादव यांच्या नावाची घोषणा केली. माजी मंत्री पाटील यांच्यासह लोकशाही व यशवंत विकास आघाडीची कोअर टीमने केलेल्या कामामुळे विधानसभेनंतर भाजपमय झालेल्या शहरात लोकशाही-यशवंत आघाडीने मुसंडी मारली.
नगराध्यक्षपद व 20 जागा जिंकत पालिकेवर आघाडीची झेंडा फडकला. राजकीय आखाड्यात भाजपला (BJP) चितपट करतानाच 'लोकशाही'ने 13, तर 'यशवंत'ने 7 अशा 20 जागांवर निर्विवाद मिळवलेले यश महत्त्वाचे व पुढच्या राजकीय आडाख्यांना बदलणारे ठरण्याची शक्यता आहे. कराडला लोकशाही-यशवंत आघाड्यांच्या यशस्वी घोडदौडीला गेमचेंजर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यशस्वी झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.