BJP Election: CM फडणवीसांनी थेट भाजपचा मागच्या 30 वर्षांचा 'स्ट्राईक रेट'च काढला; महापालिकेत 'बार्गेनिंग पॉवर' वाढणार!

BJP Municipal Election : नगरपालिका निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यश मिळवत 65 टक्के नगराध्यक्ष जिंकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 30 वर्षांचा स्ट्राईक रेट मांडत महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद अधोरेखित केली.
Chief Minister Devendra Fadnavis addressing party leaders after BJP’s record-breaking performance in municipal elections, highlighting the party’s 30-year strike rate and growing dominance in local bodies.
Chief Minister Devendra Fadnavis addressing party leaders after BJP’s record-breaking performance in municipal elections, highlighting the party’s 30-year strike rate and growing dominance in local bodies.Sarkarnama
Published on
Updated on

BJP Strike Rate News : नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने इतिहास घडवला. न भूतो न भविष्यति असे यश मिळवले. एकछत्री अंमल असताना काँग्रेसलाही साठ वर्षांत जे जमले नाही ते भाजपने करून दाखवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील 30 वर्षातील निवडणुकीचे स्टॅस्टेस्टिक तपासले आणि भाजपचा स्ट्राईक रेट काढला.

या निवडणुकीत महायुतीचे 75 टक्के नगराध्यक्ष निवडून आले. त्यात भाजपचा वाटा 65 टक्के इतका आहे याकडे लक्ष वेधून फडणवीस यांनी विरोधकांसह आपल्या मित्रपक्षांनाही भाजपचा स्ट्राईक रेट सांगितला. हे बघता महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे.

नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपने महायुती करण्याचे टाळले होते. सर्वच पक्ष वेगवेगळे लढलो होते. काही ठिकाणी उमेदवार पळवल्याने महायुतीमध्ये मोठ मतभेद उफाळून आले होते. तर पालिकांमध्ये दोस्तीत कुस्ती रंगली होती. यानंतरही भाजपने मोठी मुसंडी मारली. या निवडणुकीचे निकाल लागताच मुख्यमंत्र्यांनी नागपूर जिल्ह्यातून निवडून आलेल्या नगराध्यक्षांचा रामगिरीवर सत्कार केला.

नागपूर जिल्ह्यात महायुतीने 24 जागा जिंकल्या. 22 नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. काँग्रेसला फक्त एका जागेवर तर शिवसेना दोन, शेकाप-शरद पवार राष्ट्रवादी एक आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीला एक नगरपरिषदेवर समाधान मानावे लागले.

Chief Minister Devendra Fadnavis addressing party leaders after BJP’s record-breaking performance in municipal elections, highlighting the party’s 30-year strike rate and growing dominance in local bodies.
Mahayuti municipal elections: शेकडो नेते आयात करूनही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची दमछाक : महापालिका, ZP साठी प्लॅन बदलणार?

मुख्यमंत्री म्हणाले, भाजपने (BJP) नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. मागील निवडणुकीत भाजपचे 1500 नगरसेवक निवडून आले होते. ही संख्या आता 3 हजारावर गेली आहे. तब्बल दुप्पट नगरसेवक पक्षाचे निवडून आले आहेत. मागील 30 वर्षांचे स्टॅटेस्टिक तपासून बघता कुठल्याच पक्षाला एवढे घवघवीत यश मिळाले नाही. नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले. नगरपालिकांवर अधिकार सांगणाऱ्या नेत्यांना मोठी चपराक बसली आहे.

Chief Minister Devendra Fadnavis addressing party leaders after BJP’s record-breaking performance in municipal elections, highlighting the party’s 30-year strike rate and growing dominance in local bodies.
BJP Politics : शेवटच्या क्षणी रवींद्र चव्हाणांनी पत्ते फिरवले अन् भाजपने इतिहास रचत मिळवला दणदणीत विजय, प्रथमच नगराध्यक्षही झाला

रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस मुक्त झाली आहे. कामठीमध्ये स्थापनेपासून 40 वर्षांत प्रथमच भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला. संपूर्ण सावनेर शहरावर हक्क सांगणाऱ्या काँग्रेसच्या एका नेत्याला तोंडी लावायलाही जागा शिल्लक राहिली नसल्याचा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनील केदारांना लगावला. यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, आमदार आशिष देशमुख, माजी आमदार राजू पारवे, सुधीर पारवे, राजू पोतदार प्रामुख्याने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com