Karhad Politics : निकाल जाहीर होण्यापूर्वीच नगराध्यक्ष; एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराला भलताच 'कॉन्फीडन्स', 'ती' पाटी सोशल मीडियावर व्हायरल

Rajendrasingh Yadav Karhad Municipal Council : नगरपंचायत, नगरपरिषदेचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच नगराध्यक्षपदाची पाटी नगराध्यक्षपदाचे उमेदवार  राजेंद्रसिंह यादव यांच्या समर्थकांनी बनवून घेतली आहे.
Rajendrasingh Yadav
Rajendrasingh Yadav sarkarnama
Published on
Updated on

Karhad News : कऱ्हाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीतर्फे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव हे उमेदवार म्हणुन निवडणुक रिंगणात होते. येथील नगरपालिकेच्या मतदानाचा निकाल २१ डिसेंबरला जाहीर होणार आहे. तत्पुर्वीच त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या नावाची लोकनियुक्त नगराध्यपदाची पाटी तयार करुन ती काहीकाळ त्यांच्या कार्यालयात ठेवली होती.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून कऱ्हाडचा उल्लेख होतो. या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल नऊ वर्षानंतर निवडणुक झाली. त्यामुळे यावेळी निवडणुक ही रंगतदार झाली. यावेळी निवडणुक आयोगाने जारी केलेल्या निवडणुक कार्यक्रमाप्रमाणे उमेदवारांना चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराला अवघेच पाचच दिवस मिळाले. त्यामुळे नेत्यांसह उमेदवारांनी पायाला भिंगरी लावुन मतदारांपर्यत पोहचण्याचा प्रयत्न केला.

यावेळच्या निवडणुकीत भाजपचे नेते आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कमळाच्या चिन्हावर तर आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हाताच्या पंजावर उमेदवार उभे केले. तर माजी सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी आणि माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांची यशवंत विकास आघाडी यांनी एकत्रीतपणे निवडणुक लढवली. त्या दोन्ही आघाडीचे यादव हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते.

Rajendrasingh Yadav
Municipal Election : पुण्याचे राजकीय तापमान वाढणार! ‘इन-हाऊस विरूद्ध बाहेरचे’ वादाला ठिणगी? भाजपच्या कोअर कमिटी बैठकीतच खडाजंगीची शक्यता

शहरातील १५ ब प्रभागातील मतदान २० डिसेंबरला होणार आहे तर २१ डिसेंबरला सर्व मतदानाची एकत्रीत मोजणी होणार आहे. त्याची उत्सुकता सर्वांना लागुन आहे. मात्र तत्पुर्वीच लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र यादव यांच्या समर्थकांनी त्यांच्या नावाची लोकनियुक्त नगराध्य़पदाची पाटी तयार करुन ती काहीकाळ त्यांच्या कार्यालयात ठेवली. त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यामुळे त्याचीच चर्चा सध्या शहरात सुरु आहे.

Rajendrasingh Yadav
Jayant Patil On  Sharad Pawar : 'शरद पवारांकडून कोणीही वदवून घेऊ शकत नाही', जयंत पाटलांनी प्रशांत जगतापांच्या 'त्या' दाव्यातील हवाच काढली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com