Karmala-Madha Politics : माढा - करमाळ्यात मोहिते पाटील अन् नारायण पाटील 'बॅकफूट'वर ? संजयमामांच्या मतांचा टक्का वाढला

Sanjay Shinde- Mohite Patil- Narayan Patil News : माढा व 36 गावांत गावपातळीवर दोन्ही गट दादा संजयमामा समर्थकांचेच पाहायला मिळतात.
Karmala-Madha Politics
Karmala-Madha PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Madha - Karmala News : आमदार संजयमामा शिंदे आणि अकलूजचे मोहिते पाटील यांचं वैर संपूर्ण जिल्ह्यासह राज्याला माहीत आहे, पण माढा आणि करमाळा मतदारसंघातील 36 गावांमध्ये तसे पाहता निमगावच्या आमदार शिंदे बंधूंचा दबदबा कायमच पाहायला मिळाला आहे. एक दोन ग्रामपंचायती वगळता 36 गावे आमदार शिंदे बंधूंचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जातात. या गावांमध्ये मोहिते पाटील आणि नारायण पाटील हे बॅकफूटवर असल्याचे समोर आले आहे.

माढा व 36 गावांत गावपातळीवर दोन्ही गट दादा - मामा समर्थकांचेच पाहायला मिळतात. आणि माढा तसेच करमाळ्याला जोडलेल्या छत्तीस गावांमधील मोहिते पाटील गटाचे प्राबल्य कमी होत असताना दिवसेंदिवस आमदार शिंदे यांच्या मतांचा टक्का वाढत चाललेला आहे. करमाळा विधानसभेला माढा तालुक्यातील 36 गावांचा समावेश होऊन पंधरा वर्षे पूर्णत्वास होत आलेले आहेत.(SanjayMama Shinde)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Karmala-Madha Politics
Ram Shinde : मोठी बातमी ! राम शिंदेंच्या मध्यस्थीला यश, चौंडीतील धनगर आंदोलन स्थगित

याचवेळी करमाळा विधानसभेला जोडलेल्या 36 गावांमध्ये रोपळे कव्हे या ग्रामपंचायतीकडे सर्वात मोठी टर्निंग पॉइंट म्हणून पाहिले जाते. मोहिते-नारायण पाटलांच्या गटातून झालेले इन्कमिंग या बळावर आमदार शिंदे बंधूंना रोपळे या ठिकाणी सत्तांतर घडवून आणण्यात यश आले. माढा व 36 गावांत गावपातळीवर दोन्ही गट दादा मामा समर्थकांचेच पाहायला मिळतात. आणि माढा तसेच करमाळ्याला जोडलेल्या छत्तीस गावांमधील मोहिते पाटील गटाचे प्राबल्य कमी होत असताना दिवसेंदिवस आमदार शिंदे यांच्या मतांचा टक्का वाढत चाललेला आहे.

आमदार संजयमामा शिंदे यांची वाढती ताकद आणि करमाळ्यामध्ये मध्यंतरी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये त्यांचा वाढलेला मतांचा टक्का वाढला आहे. त्यामुळे मोहिते पाटील व नारायण पाटलांना एका बाजूने झुंज देणाऱ्या आमदार संजयमामा शिंदे यांची ताकद ही दिवसेंदिवस वाढत जात असल्याचेही बोलले जात आहे.

रश्मी बागल या पवारसाहेबांना सोडत शिवसेनेत गेल्या. परंतु, आता तिथे तरी त्यांची कितपत चलती चालणार याच्यावर प्रश्नचिन्ह आहे, त्यामुळे करमाळ्यामध्ये पुन्हा एकदा संजयमामा शिंदे हे वरचढ होत असलेले दिसत असून, माढा व करमाळा विधानसभेत मोहिते पाटील व माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) हे बॅकफूटवर गेल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

करमाळा विधानसभेला माढा तालुक्यातील 36 गावांचा समावेश होऊन पंधरा वर्षे पूर्णत्वास होत आलेले आहेत. करमाळा विधानसभेला जोडलेल्या 36 गावांमध्ये रोपळे कव्हे ही सर्वात मोठा टर्निंग पॉइंट असलेली ग्रामपंचायत म्हणून पाहिले जाते.

रोपळे ग्रामपंचायत आजपर्यंत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (VijaySinh Mohite Patil) व माजी आमदार नारायण पाटील यांच्या समर्थकांकडे होती; परंतु काही दिवसांपूर्वीच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांच्या विचारमंच गटाने मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाचा धुव्वा उडवत पराभव केला.

Karmala-Madha Politics
Jayakwadi Water Issue: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; जायकवाडीला उत्तर महाराष्ट्रातील धरणातून पाणी सोडलं जाणार

रोपळे ग्रामपंचायतच्या स्तरावर रश्मी बागल यांचाही गट सक्रिय होता. रश्मी बागल यांचे समर्थक आणि 36 गावांमध्ये एक मातब्बर नेते म्हणून श्रीपाद दळवी काम पाहत होते, परंतु रश्मी बागल या विधानसभा मतदारसंघात जास्त प्रमाणात अॅक्टिव्ह नसल्याने त्यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याची चर्चा आहे, तर आमदार संजयमामा शिंदे यांनी दौरे, भेटी-गाठी, बैठका, मेळावे यांनी मतदारसंघातील जनसंपर्क कायम ठेवला आहे.

याच धर्तीवर बागल गटाचे नेते श्रीपाद दळवेंचा संजयमामा शिंदे यांच्याकडे झालेला प्रवेश व मोहिते पाटील, नारायण पाटील यांच्या गटातून झालेले इन्कमिंग या बळावर आमदार शिंदे बंधूंना रोपळे या ठिकाणी सत्तांतर घडवून आणण्यात यश आले. मंगळवारी पार पडलेल्या उपसरपंच निवडीत श्रीपाद दळवे यांची निवड करण्यात आली.

Karmala-Madha Politics
Bihar Reservation Amendment Bill : बिहार सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाला राज्यपालांची मंजुरी; आता 65 टक्के आरक्षण...

मध्यंतरी रोपळे कव्हे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात आला. त्या पुतळ्याचा उद्घाटनाला संभाजीराजे छत्रपती, विधान परिषद सदस्य रणजीत सिंह मोहिते पाटील अशा अनेक मातब्बर नेतेमंडळींनी हजेरी लावली.

मोहिते पाटील समर्थक तात्यासाहेब गोडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पुतळा उद्घाटन कार्यक्रमाला एक तालुक्याचे आमदार प्रतिनिधी म्हणून संजयमामा शिंदे यांना निमंत्रण दिले गेले नव्हते. या संकुचित वृत्तीचा मनात राग धरून रोपळ्यातील मामा समर्थकांनी मोहिते पाटील समर्थक तात्यासाहेब गोडगे यांच्या पॅनेलचा सात-चारने धुव्वा उडवला.

(Edited By Deepak Kulkarni)

Karmala-Madha Politics
Raju Shetti Protest : मोठी बातमी ! राजू शेट्टींना घरच्या मैदानातच शेतकऱ्यांचा विरोध

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com